मुंबई| इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची प्रतिक्षा आता संपली आहे. शनिवारी (२६ मार्च) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी आमने सामने आले आहेत. तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक झाली आहे. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
कोलकात्याकडून अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचे पदार्पण झाले आहे. तसेच इंग्लंडच्या सॅम बिलिंग्जलाही कोलकाता संघाकडून पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असेल. तसेच कर्णधार श्रेयसचाही हा कोलकाताकडून पहिलाच सामना असेल. तसेच चेन्नईकडून न्यूझीलंडच्या धाकड सलामीवीर डेवॉन कॉनवेला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली गेली आहे.
Captain @ShreyasIyer15 wins the toss and #KKR will bowl first in the season opener of #TATAIPL 2022
Live – https://t.co/di3Jg7r0At #CSKvKKR pic.twitter.com/xpKJHTVBxz
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2022
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, मिचेल सँटनर, ऍडम मिल्ने, तुषार देशपांडे
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या-
आता कोहलीतील फलंदाज पुन्हा जागा होणार, यंदा तो १००० धावा करणार; माजी कर्णधाराचे भाकीत
स्मिथचा जबरदस्त कॅच, पण डीआरएसची ‘गुगली’ अन् बाद होऊनही नाबाद राहिला आझम- Video