---Advertisement---

सराव सामन्यात राहुल घेणार पंतची जागा, पहिल्या कसोटीतूनही अव्वल यष्टीरक्षकाला करू शकतो आऊट

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 10:53 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येत्या काही दिवसात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रो डाउन स्पेशलिस्ट दयानंद गरानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तरीदेखील भारतीय संघाच्या वेळापत्रकात कुठलाही बदल केला जाणार नाही. येत्या २० जुलैपासून भारतीय संघ डरहॅममध्ये सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे.

भारतीय संघासाठी ही मालिका अतिशय महत्वाची आहे. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील ही पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ ही मालिका जिंकण्यासाठी कसून सराव करणार आहे. रिषभ पंतला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्याऐवजी सराव सामन्यात केएल राहुल यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडणार आहे.

तसेच रिद्धीमान साहा देखील यष्टीरक्षक म्हणून एक उत्तम पर्याय आहे. परंतु तो देखील थ्रो डाउन स्पेशलिस्ट दयानंद गरानी यांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याला देखील आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

डरहॅममध्ये होणारा सराव सामना केएल राहुलसाठी कसोटी संघात पुनरागमन करण्याची एक उत्तम संधी आहे. कारण २०१९ नंतर केएल राहुलला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. या सराव सामन्यात जर त्याने शतकीय खेळी केली तर तो इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतो. संघ व्यवस्थापकांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ते केएल राहुलला सलामी फलंदाज म्हणून नाही पाहत आहेत. त्यामुळे केएल राहुलकडे मध्यक्रमात स्थान निर्माण करण्याची ही एक उत्तम संधी आहे.(kl rahul all set to keep wickets in practice match against county select eleven)

दुसरीकडे केएल राहुलमुळे अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला संघात पुनरागमन करण्यासाठी अजून प्रतिक्षा करावी लागू शकते.

सराव सामन्याचे होणार थेट प्रक्षेपण
भारत आणि काऊंटी सिलेक्ट इलेव्हेन संघामध्ये होणाऱ्या सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील होणार आहे. हा सामना डरहॅम काऊंटी संघाच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. काऊंटी सिलेक्ट इलेव्हेन संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. या संघात वॉरविकशायर संघाच्या विल रोड्सला कर्णधारपद देण्यात आले आहे. तर या संघात रेहान अहमद, टॉम एस्पिनवेल, हसीब हमीद या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

काउंटी सिलेक्ट प्लेइंग इलेव्हेन  : विल रोड्स, रेहान अहमद, टॉम एस्पिनवेल, एथान बाम्बर, जेम्स ब्रासी, जॅक  कार्सन, जाक चॅपल, हसीब हामिद, लिंडन जेम्स, जॅक  लिब्बी, क्रेग माइल्स, लियाम पीटरसन व्हाइट , जेम्स रियू, रॉब येट्स.

महत्वाच्या बातम्या 

खराब फॉर्मात असलेल्या श्रीलंकेला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर

शाम मस्तानी, मदहोश… टीम इंडियाच्या ‘कान्हा’चे बासरीवादन तुम्हालाही करेल मंत्रमुग्ध; एकदा ऐकाच

आजवर श्रीलंकेत फक्त ‘या’ ३ भारतीय कर्णधारांनी ठोकलंय शतक, नवा कॅप्टन धवन करेल हा पराक्रम?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---