---Advertisement---

वैदिक पद्धतीने बांधली राहुल-आथियाने सात जन्माची गाठ; नवदांपत्याचे फोटोज् आले समोर

On: सोमवार, जानेवारी 23, 2023 8:53 PM
KL Rahul Athiya Shetty Wedding(1)
---Advertisement---

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी सोमवारी (23 जानेवारी) एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. मागच्या मोठ्या काळापासून राहुल आणि अथिया एकमेकांना डेट होते. तर काही महिन्यापासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर सोमवारी सुनील शेट्टी  याच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर दोघांचे लग्न झाले. लग्नाला काही तास होऊन देखील एकही लग्नातील एकही फोटो समोर आला नाही. चाहत्यांना या जोडप्याचे फोटो पाहण्याची उस्तुकता लागली असतानाच राहुल आणि अथियाच्या अधिकृत सोशल मीडिया कात्यावरून फोटो शेअर केले गेले. 

केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty ) सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास लग्नबंधनात अडकल्याचे सांगितले जात आहे. लग्नासाठी मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रीत केले गेले होते. माध्यमांच्या कर्मचाऱ्यांना लग्नाच्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश नसल्यामुळे पत्रकार आणि छायाचित्रकार सुनील शेट्टी (Sunil Shetty) याच्या फार्म हाऊस बाहेर तासंतास उभे होते. अशात लग्नावेळीचा एकही फोटो बाहेर येऊ शकला नाही. हे फोटो अखेर रात्री आठ वाजता राहुल आणि अथियाच्या सोशल मीडिया खात्यांवरून शेअर केले गेले.

https://www.instagram.com/p/CnwtWxgKsK9/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CnwtWxgKsK9/?utm_source=ig_web_copy_link

राहुल आणि अथियाचे लग्न पारंपारी पद्धतीने पार पडले असून त्याचा पेहराव खूपच अप्रतिम होता. चाहत्यांकडून या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. फोटोतून असेच दिसते की, दोघांचे लग्न बंदीस्त जाते न होता खुला आकाशाखाली झाले.

भारतीय क्रिकेट संघ सध्या मायदेशात न्यूझीलंड संघाविरुद्ध वनडे मालिका खेलत आहे. केएल राहुल मात्र या मालिकेत संघासोबत नाहीये. मालिकेसाठी संघ घोषित होण्याआधी राहुलने बीसीसीआयकडे लग्नासाठी सुट्टी मागितली होती आणि बोर्डाकडून त्याला ही सुट्टी मिळाली देखील. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत देखील राहुलला विश्रांती दिली गेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी मात्र राहुल संघासोबत असेल. ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ही चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी संघात भारत दौऱ्यावर येणार आहे. (KL Rahul and Athiya Shetty’s wedding photos)

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शमी-हसीन जहॉं वादावर कोर्टाने दिला निकाल! दर महिन्याला द्यावी लागणार इतकी रक्कम
BREAKING: अखेर राहुल झाला आण्णाचा जावई! आथियाशी बांधली लग्नगाठ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---