Loading...

केएल राहुलला टीम इंडियातून वगळले; गिलला मिळाली द.आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संधी

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध 3 टी20 आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 2 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे.

या मालिकेसाठी आज बीसीसीआयने 15 जणांचा भारतीय संघ घोषित केला आहे. यामध्ये 20 वर्षीय शुबमन गिलची निवड करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून गिलने भारत अ संघाकडून दमदार कामगिरी केली होती.

त्याने नुकत्याच दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पार पडलेल्या कसोटी सामन्यात भारत अ संघाकडून पहिल्या डावात 90 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर जूलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध गिलने 2 कसोटी सामन्यात भारत अ संघाकडून 3 डावात 244 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या 204 धावांच्या द्विशतकी खेळीचाही समावेश आहे.

याबरोबरच दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या भारताच्या संघातून केएल राहुलला मात्र वगळण्यात आले आहे. तसेच हार्दिक पंड्या आणि उमेश यादवलाही या संघात संधी मिळालेली नाही.

गोलंदाजांच्या फळीत आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांना संधी मिळाली आहे. तर वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीला संधी मिळाली आहे.

Loading...

रोहित शर्मा, हनुमा विहारी, मयंक अगरवाल यांनीही संघात स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि वृद्धिमान सहाला संधी मिळाली आहे.

कसोटी मालिकेआधी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका पार पडेल.

त्यानंतर 2 ऑक्टोबर पासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिला कसोटी सामना विशाखापट्टणमला 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान रांचीत होणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह , इशांत शर्मा, शुभमन गिल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

Loading...

११ वर्षांपूर्वी कानाखाली मारलेल्या श्रीसंतला हरभजनने ट्विट करत दिल्या खास शुभेच्छा…

आज विराटचा होणार मोठा सन्मान; फिरोजशहा कोटला स्टेडीयमचेही बदलणार नाव

पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी श्रीलंका संघाला मिळाली दहशतवादी हल्ल्याची धमकी…

You might also like
Loading...