११ वर्षांपूर्वी कानाखाली मारलेल्या श्रीसंतला हरभजनने ट्विट करत दिल्या खास शुभेच्छा…

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अनेक विवादात्मक घटना घडल्या आहेत. यामध्ये 2008 च्या पहिल्याच मोसमात हरभजन सिंगने एस श्रीसंतच्या कानाखाली मारलेल्या घटनेचाही समावेश आहे.

त्यावेळी मुंबई इंडीयन्सकडून खेळत असलेल्या हरभजनने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर श्रीसंत रडतानाही दिसला होता. तसेच त्यानंतर लगेचच हरभजनने किंग्स इलेव्हन पंजाबच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन श्रीसंतची माफीही मागितली होती.

या घडनेला विसरून दोन्ही क्रिकेटपटू आता पुढे गेले आहेत. हरभजननेही अनेकदा याबद्दल माफी मागितली आहे. तसेच आता हरभजनने श्रीसंतला ओणमच्या खास शुभेच्छाही दिल्या आहेत.

प्रामुख्याने दक्षिण भारतात साजरा होणाऱ्या ओणमच्या शुभेच्छा देताना हरभजनने ट्विट केले आहे की ‘माझ्या सर्व मल्याळी मित्रांना ओणमच्या शुभेच्छा… विशेषत: माझा मित्र श्रीसंतला.’

सध्या श्रीसंतवर 2013 मध्ये झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट खेळण्यास बंदी आहे. त्याच्यावरील ही बंदी पुढीलवर्षी सप्टेंबरमध्ये उठणार आहे.

तसेच बुधवारी(11 सप्टेंबर) हरभजन प्रमाणेच अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियातून भारतवासीयांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

आज विराटचा होणार मोठा सन्मान; फिरोजशहा कोटला स्टेडीयमचेही बदलणार नाव

पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी श्रीलंका संघाला मिळाली दहशतवादी हल्ल्याची धमकी…

विराटने शेअर केला धोनीबरोबरील खास फोटो; २ तासात मिळाल्या ११ लाखांपेक्षा अधिक लाईक्स

You might also like