पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी श्रीलंका संघाला मिळाली दहशतवादी हल्ल्याची धमकी…

श्रीलंका क्रिकेट संघ या महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात श्रीलंका पाकिस्तान विरुद्ध 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळणार आहे. पण या दौऱ्यावर जाण्याआधीच श्रीलंका संघावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती श्रीलंकेच्या प्रधानमंत्री कार्यालयाला मिळाली आहे.

त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने श्रीलंका सरकारकडे संघाला पाकिस्तान दौऱ्यावर मिळणाऱ्या सुरक्षेचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे. 

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘राष्ट्रीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थितीचे ‘पुनर्मूल्यांकन’ करण्यासाठी श्रीलंका क्रिकेटने श्रीलंका सरकारची मदत मागितली आहे.’

तसेच त्यांनी म्हटले आहे की श्रीलंका संघावर संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची माहिती श्रीलंका क्रिकेटला मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यानंतर ट्विट केले आहे की ‘आम्ही श्रीलंका क्रिकेटचे प्रसिद्धीपत्रक पाहिले, पण आम्हाला श्रीलंका संघाच्या सुरक्षेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. श्रीलंका संघाला पूर्ण सुरक्षा पुरवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वचनबद्ध असल्याचे पुन्हा सांगत आहे. तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी या संदर्भात आमचे काम कायम सुरु राहील.’

याआधी 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर हल्ला झाला होता. त्यावेळी श्रीलंकेचे काही खेळाडू जखमी झाले होते. त्यामुळे पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यासाठी श्रीलंकेच्या 10 खेळाडूंनी नकार दिला आहे.

त्याचबरोबर श्रीलंका संघावर 2009 ला झालेल्या या हल्ल्यानंतर अनेक संघांनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. पण 2017 मध्ये श्रीलंका संघ लाहोरला एकमेव टी20 सामना खेळण्यासाठी गेला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटने शेअर केला धोनीबरोबरील खास फोटो; २ तासात मिळाल्या ११ लाखांपेक्षा अधिक लाईक्स

दिल्लीच्या या युवकाने असा केला २०१९ चा वर्ल्डकप अविस्मरणीय, पहा व्हिडिओ

पाचव्या ऍशेस सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या खेळाडूला मिळाली संधी

You might also like