आज विराटचा होणार मोठा सन्मान; फिरोजशहा कोटला स्टेडीयमचेही बदलणार नाव

दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने(डीडीसीए) दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडीयमच्या एका स्टँडला भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्याची, तसेच या स्टेडीयमला डीडीसीएचे माजी अध्यक्ष दिवंगत अरुण जेटली यांचे नाव देण्याची तयारी केली आहे.

स्टँडला विराटचे तर स्टेडीयमला जेटलींचे नाव देण्याचा कार्यक्रम आज(12 सप्टेंबर) जवाहरलाल नेहरु स्टेडीयमच्या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

याबद्दल डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले, ‘आम्हाला हा शानदार कार्यक्रम करायचा आहे, जिथे आम्ही जेटलीजींच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी त्यांना सर्वोत्तम श्रद्धांजली देऊ शकतो.’

‘क्रिकेटशी कोणत्याही प्रकारे जोडलेला व्यक्ती जाणतो की त्यांच्या योगदानाने दिल्ली क्रिकेटला आणि दिल्लीच्या क्रिकेटपटूंना मदत झाली आहे. स्टेडीयमला त्यांचे नाव दिल्याने आमचा उद्देश पूर्ण होईल.’

तसेच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि दिल्लीसाठी खेळताना जे यश मिळवले आहे, त्याबद्दल त्याचा सन्मान म्हणून एका स्टँडला विराटचे नाव देण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

त्याचबरोबर कोटला स्टेडीयमला जरी जेटलींचे नाव दिले जाणार असले तरी मैदान फिरोजशहा कोटला नावानेच ओळखले जाणार असल्याचे डीडीसीएने आधीच स्पष्ट केले आहे.

या कार्यक्रमासाठी केंद्रिय क्रिडामंत्री किरण रिजिजू, भारतीय संघातील आजी-माजी खेळाडू, बीसीसीआयचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात भारतीय संघातील खेळाडूंचा तसेच दिल्लीच्या खेळाडूंचाही सन्मान केला जाणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी श्रीलंका संघाला मिळाली दहशतवादी हल्ल्याची धमकी…

विराटने शेअर केला धोनीबरोबरील खास फोटो; २ तासात मिळाल्या ११ लाखांपेक्षा अधिक लाईक्स

दिल्लीच्या या युवकाने असा केला २०१९ चा वर्ल्डकप अविस्मरणीय, पहा व्हिडिओ

You might also like