---Advertisement---

विराट-रोहितनंंतर आता चहल ‘या’ भारतीय खेळाडूच्या रडारवर; केले ट्रोल

On: बुधवार, मे 13, 2020 9:27 AM
---Advertisement---

लॉकडाऊनमध्ये जवळपास अनेक खेळाडू सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. क्रिकेटपटू लाईव्ह व्हिडिओ चॅटमार्फत चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने रविवारी (१० मे) चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले होते.

राहुलने (KL Rahul) ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आपल्या आवडत्या फलंदाजापासून ते फॅशन आयकॉनपर्यंत सर्वांबद्दल चर्चा केली. तसेच त्याला फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबद्दल विचारले असता, त्याने असे उत्तर दिले की त्यामुळे चाहत्यांना हसू आवरता आले नाही.

खरंतर यादरम्यान सौरभ मल्होत्रा नावाच्या खेळाडूने राहुलला विचारले की, “चहलच्या टिक-टॉक व्हिडिओबद्दल तुझे मत काय आहे?” या प्रश्नाचे उत्तर देत राहुल म्हणाला की, “चहलने मैदानावर गुगलीच टाकण्यापर्यंतच मर्यादीत राहिले पाहिजे.” याबरोबरच त्याने हसणारे ईमोजीचाही यामध्ये समावेश केला.

कोरोना व्हायरसदरम्यान चहल टिक-टॉकवर अनेक व्हिडिओ बनवत आहे. त्याने आतापर्यंत आपल्या बहिनीबरोबर आणि परिवाराबरोबरही व्हिडिओ तयार केले आहेत. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तरी या व्हिडिओंमुळे संघसहकारी त्याला आपला निशाना बनवत आहेत.

यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) लाईव्ह व्हिडिओमध्ये एबी डिविलियर्सला (AB De Villiers) म्हटले होते की, “तू चहलचे लाईव्ह व्हिडिओ पाहिले आहेत का? तो टिकटॉक व्हिडिओ बनवतो. तू बघ. एकदम जोकरप्रमाणे दिसतो. त्याला पाहून वाटणारही नाही की तो २९ वर्षीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.”

तसेच जसप्रीत बुमराहबरोबरच्या (Jasprit Bumrah) लाईव्ह चॅटदरम्यान रोहित शर्माने (Rohit Sharma) चहलबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याने म्हटले होते की, “चहल आपल्या वडिलांना डान्स करायला सांगत आहे. त्याला लाज वाटते की नाही.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-चहलने विचारलं असा काही प्रश्न, युवराज म्हणाला; रोहित- रैनाचे गाल पहा

-जेव्हा सुरेश रैना बोलतो मराठीत, रोहितही देतो मराठीत उत्तर

-अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयकडून या २ क्रिकेटपटूंच्या नावाची शिफारस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---