भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारी (19 फेब्रुवारी) निकाली निघाला. भारताने या सामन्यात 6 विकेट्स राखून तिसऱ्याच दिवशी पाहुण्या संघाला पराभवाची धूळ चारली. बीसीसीआयने यापूर्वी या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली होती. उभय संघांतील तिसरा आणि चौथा कसोटी सामना मार्च महिन्यात खेळला जाईल. शेवटच्या या दोन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने रविवारी संघाची घोषणा केली. संघाचा सलामीवीर केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून सातत्याने निराशाजनक कामगिरी करत आहे. पण तरिदेखील निवडकर्त्यांनी पुन्हा त्याला संघात सामील केले.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी निवडलेल्या संघात एकही बदल पाहायला मिळाला नाही. याच संघाने भारताला पहिला सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकवून दिला होता. तर दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी संघाला मिळालेल्या या विजयात सलामीवीर केएल राहुल अवघ्या 38 धावांचे योगदान देऊ शकला. राहुल मागच्या मोठ्या काळापासून धावा करण्यासाठी झगडताना दिसत आहे. एकंदरीत विचार केला, तर 2018 पासून राहुलथने खेळलेल्या 26 कसोटी सामन्यांमध्ये 1224 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश असून सरासरी अलघी 25.82 राहिली आहे.
सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे चाहतेही त्याच्यावर चांगलेच नाराज आहेत. अशात संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी त्याला संघात घेतले आणि नेटकरी चांगलेच भडकले. राहुलला या संघात घेतल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे. नेटकरी राहुलसह त्याला निवडणाऱ्या संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांवर देखील निशाणा साधताना दिसत आहे.
#INDvAUS #KLRahul𓃵
Leee KL fir gaiL🤣🤣But no matter we will keep backing him❤️ @klrahul pic.twitter.com/z6rzo6sdJn
— Sneha Singh Chandel🇮🇳 (@sneha_raj15) February 19, 2023
https://twitter.com/Nitishp2510/status/1627292470043353089?s=20
Dressing Room Waits kl Rahul ✔️#KLRahul𓃵 #BGT2023 pic.twitter.com/1Ai2BcjDZQ
— Nadeem khan (@Nadeem2khan1) February 19, 2023
@theathiyashetty Really? #INDvsAUS #KLRahul𓃵 https://t.co/CWVaCkDWU4
— Mishraji (@go_tiya_) February 19, 2023
राहुलने बॉर्डर गावसकर मालिकेच्या पहिल्या सामन्यात 20 धावांची खेळी करून विकेट गमावली. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 17 आणि 1 धाव करून विकेट गमावली. स्वस्तात बाद होत असल्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर राहुलविषयीच्या मिम्सचा पाऊस पाडला आहे. सर्वत्र त्याला पुन्हा संघात घेतल्यामुळे चर्चा सुरू आहे. (KL Rahul gets chance in Tests again, but fans are expressing their displeasure)
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! कर्णधार रोहित शर्मा ‘या’ सामन्याला मुकणार, पाहा काय आहे कारण
जडेजाच्या नावे आणखी एक विक्रम! आता विराटला पछाडत बसला थेट सचिनच्या मांडीला मांडी लावून