भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल रविवारी (4 डिसेंबर) चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. राहुलने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 73 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण संघातील इतर फलंदाज मात्र पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात भारताने अवघ्या एका विकेटने पराभव स्वीकारला. केएल राहुलने सोडलेला एक झेल संघाला चांगलाच महागात पडला. असे असले तरी, राहुलचे सामन्यातील योगदान महत्वाचे राहिले. सामना संपल्यानंतर त्याने संघ व्यवस्थापनाने सोपवलेल्या नव्या जबाबदारीचा खुलासा केला.
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला संघ व्यवस्थापनाने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर केले. माहितीनुसार पंतला मेडिलक टीमने विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर केएल राहुल (KL Rahul) संघासाठी यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात खेळताना दिसला. तसेच फलंदाजाच्या रूपात देखील तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. राहुलने या सामन्यात सलामीऐवजी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. त्याने 70 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 73 धावा केल्या. संघ व्यवस्थापनाने राहुलला यष्टीरक्षक आणि मध्यक्रमातील फलंदाज बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केली आहेत, असे त्याने स्वतः सांगितले.
सामना संपल्यानंतर केएल राहुल () माध्यमांशी बोलत होता. त्यावेळी तो म्हणाली, “आम्ही मागच्या आठ-नऊ सामन्यांमध्ये जास्त एकदिवसीय सामने खेळले नाहीत, पण तुम्ही 2020-21 मध्ये पाहिले, तर मी यष्टीरक्षक म्हणून खेळलो आहे. तसेच चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीही केली आहे. संघाने माला ही भूमिका सोपवली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ही भूमिका पार पाडण्यासाठी मी तयार आहे.”
भारतीय दिग्गज सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) संध्या संघासोबत बांगलादेश दौऱ्यात आहे. सलामीवीराच्या रूपात धवन आणि रोहित शर्मा खेळत असल्यामुळे राहुलला मध्यक्रमात खेळण्याची संधी मिळाली. तसेच पंत एकदिवसीय संघातून बाहेर झाल्यानंतर यष्टीरक्षक म्हणून देखील त्यानेच धुरा सांभाळली. पंतविषयी बोलताना राहुल म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे जाले, तर मला आजच समजले की, तो संघातून बाहेर होत आहे. यामागचे कारण आणि याविषयीच्या प्रशांची उत्तर मेडिकल टीम चांगल्या पद्धतीने देऊ शकेल.” (KL Rahul has been asked by the team management to be ready as wicketkeeper)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला हरवल्यावर बांगलादेशच्या कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला,’आम्हाला वाटलं होत..’
HBD ‘गब्बर’! चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी