भारतीय संघाने सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसर्या टी-२० सामन्यात ६ गडी राखून विजय मिळविला. यासह भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी देखील घेतली. याच सामन्यात भारताचा उपकर्णधार केएल राहुलच्या नावे एका विशेष विक्रमाची नोंद झाली.
पहिल्या ४० टी-२० डावात सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत राहुलने चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारली. आजच्या सामन्यात २२ चेंडूत ३० धावा करत राहुलने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत एकूण १५४२ धावांचा टप्पा गाठला. या यादीत दुसर्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकण्याची राहुलची संधी केवळ ६ धावांनी हुकली.
पहिल्या क्रमांकावर आहे विराट कोहली
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत पहिल्या ४० डावात सर्वाधिक धावा काढणार्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहलीने पहिल्या ४० डावात ५९ च्या सरासरीने तब्बल १६४१ धावा फटकाविल्या आहेत. या यादीतील इतर फलंदाज विराटपेक्षा जवळपास १०० धावांनी पिछाडीवर आहेत.
या यादीत पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझम दुसर्या, तर ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कर्णधार ऍरॉन फिंच तिसर्या स्थानावर आहे. केएल राहुलने आजच्या कामगिरीने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले. गेलच्या नावावर पहिल्या ४० टी-२० डावात ३३ च्या सरासरीने १२३६ धावा आहेत. आता ख्रिस गेल पाचव्या क्रमांकावर असून दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस १२२५ धावांसह सहाव्या क्रमांकावर आहेत.
पहिल्या ४० आंतरराष्ट्रीय टी-२० डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१. १६४१ (सरासरी-५९)- विराट कोहली
२. १५४८ (सरासरी-५०)- बाबर आझम
३. १५४६ (सरासरी-४७)- ऍरॉन फिंच
४. १५४२ (सरासरी-४५)- केएल राहुल
५. १२३६ (सरासरी-३३)- ख्रिस गेल
६. १२२५ (सरासरी-३६)- फाफ डू प्लेसिस
महत्त्वाच्या बातम्या-
धवनने पाडला धावांचा पाऊस; अर्धशतक करत गंभीर, रैनालाही टाकले मागे
अरेरे! दुसऱ्या टी२० सामन्यात चहल ठरला महागडा, ‘या’ नकोशा यादीत पटकावले अव्वल स्थान
ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली आठ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर