भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका नोव्हेंबरच्या अखेरीस सुरु होणार आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना खेळला जाईल. या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेल्या केएल राहुलने याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर प्रथम वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. याशिवाय 17 डिसेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळणार आहे. केएल राहुल वनडे आणि टी20 सामन्यात भारतीय संघाकडून यष्टिरक्षण करताना दिसेल. त्याचवेळी, वृद्धीमान साहा आणि रिषभ पंतची कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे.
वास्तविक केएल राहुलने इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्वत: चे एक छायाचित्र शेअर केले आहे. अभिनेत्री अथिया शेट्टीसह राहुलने त्याच्या इतर मित्रांना या पोस्टमध्ये टॅग केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की “युनो कार्ड खेळतानाची रात्र मिस करतोयं.”
https://www.instagram.com/p/CHm5lWsA5Cb/?utm_source=ig_web_copy_link
राहुलचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर टिप्पणी करताना अथियाने ‘ग्रेट कार्ड्स’ असे लिहिले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या फोटोचीच चर्चा आहे.
#KLRahul pic.twitter.com/7wvvwKSTul
— Vishal Kumar (@VishalSports123) November 16, 2020
नुकतेच केएल राहुलने अथियाच्या वाढदिवशी एक छायाचित्र शेअर केले होते आणि तिला शुभेच्छा देत त्याने तिचा उल्लेख ‘वेडी मुलगी’ असा केला होता. अथियाबरोबरचे केएल राहुलचे हे छायाचित्रही खूप व्हायरल झाले होते. यामागे त्यांच्यात अफेअर चालू असल्याची चर्चा कारणीभूत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“आयपीएलमध्ये पूर्ण पैसे मिळावेत म्हणून खेळाडू लपवून ठेवतात दुखापती”
अजीत आगरकर होणार बीसीसीआयच्या निवड समितीचा प्रमुख? पाहा काय आहे कारण
डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीने उघडले रहस्य; म्हणाली त्याला हवे ते तो करू शकतो
ट्रेंडिंग लेख
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…