सध्या इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवला होता, मात्र भारताने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला.
त्यांनतरच्या आजच्या तिसऱ्या सामन्यात भारताने संघात केवळ एक बदल केला. सूर्यकुमार यादवच्या जागी भारताने या सामन्यात नियमित सलामीवीर रोहित शर्माला संघात स्थान दिले. रोहित शर्माच्या साथीने केएल राहुलने या सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात केली. मात्र याही सामन्यात तो स्वस्तात बाद झाला.
केएल राहुलचा खराब फॉर्म कायम
गेले काही सामने केएल राहुल सातत्याने अपयशी ठरत आहे. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यात त्याने केवळ २ अर्धशतके झळकावली होती. त्यानंतर आत्ता खेळवल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत पहिल्या तीन सामन्यात त्याने अनुक्रमे १, ० आणि ० अशा धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यात देखील अपयशी ठरल्याने आता त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राहुल आजच्या सामन्यातही डावाच्या तिसऱ्याच षटकात बाद झाला. राहुल आजही खाते न उघडताच बाद झाला. मार्क वूडने एका अप्रतिम चेंडूवर त्याला त्रिफळाचीत करत माघारी धाडले. त्यामुळे भारताला पॉवरप्ले संपण्याआधीच पहिला धक्का बसला.
Always With You Champ
#WeStandForKL
KL Rahul #KLRahul @klrahul11 pic.twitter.com/NR1Rn24U90— Zoo Ntr (@pottipukaNTR) March 16, 2021
दरम्यान, आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. भारताच्या फलंदाजांनी याही सामन्यात हाराकिरी पत्करली. मात्र कर्णधार विराट कोहलीने एका बाजूने खिंड लढवत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना ४६ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून ३ बळी घेत मार्क वूड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
महत्वाच्या बातम्या:
कसोटीत जबरदस्त कामगिरी केलेल्या अश्विनने वनडे, टी२०मध्ये संधी मिळत नसल्याबद्दल सोडले मौन; म्हणाला