---Advertisement---

धक्कादायक! माजी कर्णधारासह ‘हा’ आक्रमक फलंदाज सापडला मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी, झाली आठ वर्षाची शिक्षा

On: मंगळवार, मार्च 16, 2021 8:59 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही काळापासून कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मॅचफिक्सिंग प्रकरणात सापडला नव्हता. मात्र, आयसीसीने आज (१६ मार्च) युएईचे दोन अनुभवी खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याचे जाहीर केले. या दोघांनाही ८ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन १९ ऑक्टोबर २०१९ पासून असेल.

आयसीसीने सुनावली शिक्षा
आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद नाविद व अनुभवी फलंदाज शैमन अन्वर यांना मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी जाहीर केले. २०१९ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषक पात्रता फेरीत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि ते त्यात दोषी आढळून आले. या दोघांनीही समितीसमोर सुनावणी घेण्याची मागणी केली होती.

आयसीसीने दिली प्रतिक्रिया
या प्रकरणाच्या निकालानंतर आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने पुढे येऊन प्रतिक्रिया देताना म्हटले, “हे दोन्ही खेळाडू आठ वर्षासाठी निलंबित राहतील. दोघांनीही आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकाच्या २०१९ पात्रता फेरीत मॅच फिक्सिंग केली होती. तसेच, त्यांनी आयसीसीच्या लाचलुचपत प्रत्येक विभागाला याबाबत माहिती दिली नव्हती. या आरोपांवरून त्यांना दोषी ठरवण्यात आले.”

नाविद २०१९ मध्ये टी१० लीग वेळीही अशाच प्रकारच्या प्रकरणात सामील होता.

दोघेही युएईचे अनुभवी खेळाडू
सध्या ३३ वर्षाचा असलेला नाविद हा युएईसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असून संघाचा माजी कर्णधार आहे. दुसरीकडे, ४२ वर्षीय शैमन अन्वर युएईचा सर्वात अनुभवी खेळाडू मानला जातो. त्याने युएईसाठी ७२ वनडे सामने खेळताना २,१९० धावा काढल्या आहेत. २०१५ क्रिकेट विश्वचषकात युएईसाठी ६ सामन्यात एका शतकासह सर्वाधिक ६११ धावा आपल्या नावे केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

तिसऱ्या सामन्यात मैदानावर उतरताच मॉर्गनच्या नावे झाला मोठा विक्रम; ‘या’ इंग्लंड दिग्गजांच्या यादीत सामील

भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंची टी२० कारकिर्द संपल्यात जमा

कसोटीत जबरदस्त कामगिरी केलेल्या अश्विनने वनडे, टी२०मध्ये संधी मिळत नसल्याबद्दल सोडले मौन; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---