---Advertisement---

Video: “कर्णधार म्हणून तुझा रेकॉर्ड चांगला नाही”, पत्रकाराच्या प्रश्नावर केएल राहुलची तिखट प्रतिक्रिया

On: शुक्रवार, जानेवारी 21, 2022 4:09 PM
KL Rahul
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या सामन्यात भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील भारतीय संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेत रोहित शर्मा याच्या( Rohit Sharma)  अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद केएल राहुल याला देण्यात आले आहे. दरम्यान, दुसरा वनडे सामना सुरू होण्यापूर्वी केएल राहूलचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्रकाराला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसून येत आहे.

या मालिकेतील दुसरा वनडे सामना (Sa vs Ind 2nd odi) शुक्रवारी (२१ जानेवारी) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी केएल राहुल चर्चेत आला आहे. तर झाले असे की, एका पत्रकाराने केएल राहुलला (Kl Rahul viral video) विचारले की, “आयपीएल स्पर्धेत कर्णधार म्हणून तुझा रेकॉर्ड चांगला नव्हता. तर जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तू एमएस धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला आहेस. तुझ्या आणि त्यांच्या नेतृत्वात काय फरक आहे? तुला काय सुधारणा करावी लागेल?”

या प्रश्नाचे उत्तर देत असताना केएल राहुल हसला आणि त्याने म्हटले की, “आकडेवारी पाहण्यासाठी धन्यवाद. हे सर्व पाहून माझा आत्मविश्वास वाढत असतो.”

फलंदाज म्हणून हिट ठरत असलेल्या केएल राहुलला संघाचे नेतृत्व करताना आपली छाप सोडता आली नाहीये. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील त्याच्या नेतृत्त्वात खेळले गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर, पहिल्या वनडे सामन्यात देखील भारतीय संघाला ३१ धावांनी परवभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघाला जर वनडे मालिकेतील आव्हान टिकवून ठेवायचे असेल, तर येणाऱ्या सामन्यात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांच्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. परंतु, हे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. शेवटी शार्दुल ठाकूरने फलंदाजीला येऊन नाबाद ५० धावांची खेळी करत भारतीय संघाला मोठ्या पराभवापासून वाचवले.

महत्वाच्या बातम्या :

मोठा बातमीः भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने, याचवर्षी ‘या’ दिवशी खेळणार सामना

टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक घोषित; भारत-पाकिस्तान सामना रंगणार ‘या’ दिवशी

हे नक्की पाहा:

अभ्यासू कीडा असलेला Axar Patel फक्त आज्जीमुळे बनला क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---