---Advertisement---

रोहित शर्मा-केएल राहुलचे दुसऱ्या वनडेत शानदार शतके पूर्ण!

On: बुधवार, डिसेंबर 18, 2019 4:30 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। आज(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा वनडे सामना होत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी वेस्ट इंडिजला सुरुवातीला कोणतेही यश मिळू दिलेले नाही.

या दोघांनीही या सामन्यात त्यांची वैयक्तिक शतके पूर्ण केली आहेत. रोहितने 107 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले, तर राहुलने 102 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले आहे. रोहितचे हे 28 वे वनडे शतक आहे आणि राहुलचे 3 रे वनडे शतक आहे.

मात्र राहुल शतक पूर्ण करताच अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 104 चेंडूत 102 धावांची खेळी केली. या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचबरोबर सध्या रोहित नाबाद खेळत आहे. रोहित आणि राहुल यांनी 227 धावांची सलामी भागीदारीही रचली.

भारतीय सलामीवीरांच्या जोडीने केलेली ही वनडेतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

वनडेत सर्वोच्च धावांची सलामी भागीदारी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंची जोडी – 

258 धावा – सौरव गांगुली – सचिन तेंडूलकर

231 धावा – शिखर धवन – अजिंक्य रहाणे

227 धावा – रोहित शर्मा – केएल राहुल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---