---Advertisement---

राहुलने सलामीला ५ शतके ठोकलीत, तरीही त्याला खाली खेळवण्याचा अट्टाहास का? दिग्गजाचा मोठा प्रश्न

On: गुरूवार, जुलै 8, 2021 5:27 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यापुर्वीच भारतीय संघाच्या काही निर्णयांच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील पराभवानंतर क्रिकेटपटूंना मिळालेली २० दिवसांची सुट्टी, सराव सामना, शुबमन गिलचा पर्यायी खेळाडू अशा बऱ्याचशा विषयांसंदर्भातच्या चर्चा चालू आहेत. अखेर संघ निवडकर्त्यांनी शुबमनचा पर्यायी खेळाडू म्हणून सलामीवीर पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलावण्याची मागणी फेटाळल्यानंतर सलामीवीर केएल राहुल चर्चेत आला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने याप्रकरणी संघ व्यवस्थापनाला प्रश्नही विचारले आहेत.

दुखापतीमुळे युवा सलामीवीर शुबमन इंग्लंडविरुद्धच्या पूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत मयंक अगरवाल, केएल राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन हे सलामी फलंदाजाचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र संघ व्यवस्थापन राहुलला वरच्या फळीत न खेळवता मधल्या फळीत खेळवणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यांच्या या निर्णयावरुन प्रसिद्ध समालोचक चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. राहुलने सलामीवीर म्हणून खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या सलामीच्या भूमिकेवर दुर्लक्ष करू नये, असे त्याचे म्हणणे आहे.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाला की, “राहुल सध्या इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघात उपलब्ध आहे. अशी चर्चा आहे की, तो इंग्लंडविरुद्ध सलामीला फलंदाजीसाठी उतरणार नाही. संघ व्यवस्थापणाने आधीच घोषणा करुन ठेवली आहे की, तो मधल्या फळीत खेळणार आहे. मला कळत नाही, संघ व्यवस्थापन अचानक त्याला मधल्या फळीत का खेळवू इच्छित आहे?”

“हा खूप आश्चर्यकारक निर्णय आहे. कारण राहुलने कसोटीत ५ शतके झळकावली आहेत, तेही वरच्या फळीत खेळताना. मला तर वाटत होते की, तो एक बॅकअप सलामीवीर आहे. परंतु चित्र याउलट आहे. त्यातही शुबमन बाहेर पडल्यानंतरही त्याचा सलामीला वापर करण्याबाबत विचार केला जात नाहीये, याचे मला नवल वाटत आहे,” असेही चोप्रा म्हणाला.

तसेच तो पुढे म्हणला, “जेव्हा संघ व्यवस्थापनाने शुबमनचा पर्यायी खेळाडू म्हणून श्रीलंकेहून पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडीक्कलला पाठवण्याची मागणी केली, तेव्हा निवडकर्त्यांनी नकार दिला. कारण त्यांना कोणत्या तरी हेतूने श्रीलंकेला पाठवण्यात आले आहे आणि जरी त्यांना इंग्लंडले पाठवले गेले असते. तरीही तुम्ही मयंक अगरवाल आणि अभिमन्यू ईश्वरन असताना त्यांना खेळवाल, याची हमी नव्हती. त्यामुळे निवडकर्त्यांचा हा निर्णय सर्व अंगांनी योग्य होता.”

महत्त्वाच्या बातम्या-

सारा तेंडुलकरने ‘ती’ पोस्ट शेअर करताच, चाहत्यांना पुन्हा आठवला शुबमन गिल

भारतासोबत खेळून मालमाल होणार श्रीलंका क्रिकेट, ६ सामन्यांचे मिळणार चक्क ‘इतके’ कोटी

सध्याच्या भारतीय संघातील केवळ ‘हे’ ६ खेळाडू खेळलेत श्रीलंकेविरुद्ध वनडे; एकट्या द्रविडच्या धावा आहेत त्यांच्यापेक्षा अधिक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---