---Advertisement---

प्रेक्षकांना लवकरच दिसणार राहुलचा कमाल,लाजवाब अंदाज; वाचा पोस्ट करत काय म्हणाला

---Advertisement---

भारतीय संघाच महत्वाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) सध्या जर्मनीमध्ये आहे. त्याठिकाणी राहुलची शस्त्रक्रिया पार पाडली आहे. त्याने हॉस्पिटलमधून शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने स्वतःच्या फिटनेसची माहिती दिली आहे. राहुलची प्रेयसी आथिया शेट्टीही जर्मनीमध्ये त्याच्यासोबत आहे. राहुलवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, तो आता पुन्हा फिट होऊ लागला आहे.

आयपीएल २०२२ गाजवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी केएल राहुल (KL Rahul) उपस्थित राहू शकला नव्हता. दुखपतीमुळेच त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. तो दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली होती आणि याच कारणास्तव त्याला इंग्लंड दौऱ्यात देखील सहभागी होता आले नाही. परंतु त्याचा प्रयत्न असेल की, आगामी काळातील टी-२० विश्वचषकासाठी तो भारताचे प्रतिनिधित्व करेल. राहुल सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे आणि मर्यादित षटकांच्या संघाचा तो उपकर्णधार देखील आहे.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर राहुलने हॉस्पिटलमधून त्याचा खास पोटो शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “मागचे दोन आठवडे खूपच कठीण राहिले आहेत. पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी चांगल्या पद्धतीने तंदुरूस्त होत आहे. माझ्या पुनरागमनाचा प्रवास सुरू झाला आहे. तुमच्या संदेश आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. लवकरच भेटू.”

https://twitter.com/klrahul/status/1542200045722017792?s=20&t=UFFMRHklg_I23Kj_BwlvKQ

दरम्यान, राहुल आयपीलएच्या (इंडियन प्रीमियर लीग) इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केले. यावर्षी त्याने नवख्या लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले आणि संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवले. असे असले तरी, एलिमिनेटर सामन्यात संघ पराभूत झाल्यामुळे त्याचा प्रवास त्याच ठिकाणी संपला. एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पराभवाची धूळ चारली होती.

आयपीएलनंतर रोहित शर्मा विश्रांतीवर असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत केएल राहुल भारताचे नेतृत्व करणार होता, पण दुखापतीमुळे त्याला या मालिकेत खेळता आले नाही. अशा स्थितीत रिषभ पंत (Rishabh Pant) याने कर्णधाराची भूमिका पार पाडली. पंतच्या वैयक्तिक प्रदर्शनावर कर्णधारपदामुळे मोठा परिणाम झाल्याचे पाहिले गेले. राहुलने कर्णधाराच्या रूपात भारतासाठी चार सामने खेळले आहेत आणि त्यातील एकही सामना जिंकलेला नाहीये.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

तब्बल ३६ वर्षानंतर एजबस्टन कसोटीमध्ये बुमराहमुळे घडू शकतो ‘तो’ योगायोग

“संजू सॅमसन रोहित शर्माच्या कॅटगिरीतील फलंदाज”

नर्व्हस नायंटीजचा शिकार झाला असता हुड्डा; कसा वाचला सामन्यानंतर सांगितले मित्राला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---