---Advertisement---

बाद की नाबाद? ‘या’ कारणामुळे केएल राहुलच्या विकेटवर वादाला सुरुवात

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 12:19 AM
---Advertisement---

इंग्लंडच्या ओव्हल मैदानात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली सुरूवात केली होती. सलामीचे फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने राहुलला बाद करत ही भागीदारी संपुष्टात आणली. यादरम्यान राहुलच्या या विकेटवर आता वाद चालू झाला आहे.

दुसऱ्या डावात राहुल ४६ धावांवर खेळत होता, तेव्हा ३४ व्या षटकात अँडरसन गोलंदाजीसाठी आला होता. अँडरसनच्या चेंडूने राहुलच्या बॅटचा कड घेतली आणि तो चेंडू सरळ यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टोच्या हाती गेला. सुरुवातीला मैदानातील पंचांनी राहुलला नाबाद करार दिले होते. मात्र, यावर इंग्लंडने रिव्ह्यू घेतला आणि थर्ड अंपायरने राहुलला बाद घोषित केले. थर्ड अंपायरच्या या निर्णयामुळे राहुल चांगलाच निराश झाला. त्याची नाराजी पवेलियनमध्ये जाताना स्पष्ट दिसत होती.

तसेच समालोचन करत असलेले भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीदेखील थर्ड अंपायरच्या या निर्णयावर आक्षेप घेतला, तर दुसरीकडे सोशल मीडियावर देखील अनेक चाहत्यांनी राहुलला नाबाद घोषित केले. तसेच काही चाहत्यांच्या मते अंपायरने योग्य निर्णय घेतला.

अँडरसनने ३४ व्या षटकातील टाकलेला शेवटचा चेंडू आउट स्विंग होऊन बाहेर निघाला. या चेंडूवर राहुलने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अपयशी ठरला. यावर इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. मैदानातील पंचांनी नाबाद घोषित केल्यानंतर इंग्लंडने रिव्ह्यू घेतला ज्यामध्ये थर्ड अंपायरने स्निको मीटरची मदत घेतली. ज्यामध्ये चेंडू बॅटच्या जवळून गेलेला दिसतो. मात्र, स्निको मीटरवर झालेल्या हालचालींमुळे थर्ड अंपायरने राहुलला बाद घोषित केले. मात्र यावर राहुलने चांगलीच नाराजी व्यक्त केली.

राहुलच्या मते बॅटचा कडा त्याच्या मागील पायातील पॅडवर लागला होता. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नव्हता. सुनील गावसकर यांनी देखील असेच मत व्यक्त केले होते. त्यांनी तर थर्ड अंपायरच्या या निर्णयावर नाराजी दाखवली. मात्र तोपर्यंत थर्ड अंपायरने त्यांचा निर्णय घोषित केला होता.

https://twitter.com/ViratAkhilHari1/status/1434116371751718920

https://twitter.com/cricCrazyManav/status/1434116169904975874

तसेच सोशल मीडियावर राहुलच्या या विकेटला घेऊन चाहते २ गटात विभागले. काहींच्या मते राहुल बाद होता, तर काहींनी त्याला नाबाद असल्याचे देखील सांगितले. राहुलने दुसऱ्या डावात ४६ धावांची खेळी केली. यासह त्याने या मालिकेत ३०० धावांचा टप्पा देखील पार केला.

महत्वाच्या बातम्या –
क्या बात है! क्रिकेटमध्ये अवघड वाटणाऱ्या ५ विक्रमांपैकी दोन आहेत भारतीयांच्या नावावर
लोकल बॉय इन ॲक्शन! केएल राहुलला अँडरसनने ‘असं’ बाद करत इंग्लंडला मिळवून दिली पहिली विकेट
धोनीबाबत विचारलेल्या ‘या’ प्रश्नाबाबत गांगुली-सेहवाग संभ्रमात, विशेष तज्ञांची घ्यावी लागली मदत

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---