जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 सुरू होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. त्याआधी स्पर्धेचे वातावरण तापू लागले असून, अनेक आजी-माजी क्रिकेटपटू अंदाज व्यक्त करत आहेत. वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू तसेच आयपीएलमध्ये दिग्गजाचा दर्जा प्राप्त असलेला ख्रिस गेल नुकताच एक मोठी गोष्ट बोलून गेला.
आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला गेल सध्या आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म साठी समीक्षक म्हणून भूमिका बजावत आहे. त्यावेळी त्याला काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये एक प्रश्न त्याला विचारण्यात आला की, तुला काय वाटते तुझा 175 धावांचा आयपीएल विक्रम कोणता फलंदाज मोडू शकतो? त्यावर गेलने भारताचा प्रमुख फलंदाज केएल राहुल याचे नाव घेतले.
राहुल याची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द शानदार राहिली आहे. भारतीय संघाचा नियमित सदस्य असलेला राहुल लखनऊ सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व करतो. त्याने यापूर्वी पंजाब किंग्स संघाचे देखील नेतृत्व केले आहे. त्याने आतापर्यंत 109 आयपीएल सामन्यांमध्ये 48.1 च्या सरासरीने व 136 च्या स्ट्राईक रेटने 3839 धावा केल्या आहेत. यामध्ये तब्बल चार शतकांचा समावेश आहे.
गेलच्या ज्या शतकाचा प्रश्नांमध्ये उल्लेख होता ते शतक त्याने 2013 आयपीएल हंगामात झळकावले होते. गेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी खेळत असताना पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध त्याने 175 धावांची खेळी केली होती. टी20 क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळी असलेल्या या खेळीमध्ये त्याने 30 चेंडूंमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विश्वविक्रम केलेला. या खेळी दरम्यान गेलने 66 चेंडूवर 13 चौकार व 17 षटकारांच्या मदतीने नाबाद 175 धावा कुटलेल्या.
(KL Rahul Will Break My 175 Runs IPL Record Chris Gayle Predict)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, ‘आम्ही राहुलसारखी फलंदाजी…’
ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील






