वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी सर्व 10 संघांचे स्क्वॉड घोषित झाले आहे. स्पर्धेतून अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. दुसरीकडे अनेक नवीन खेळाडू पहिल्यांदाच वनडे विश्वचषकाचा भाग असणार आहेत. चला तर, या विश्वचषकात 10 संघांनी जाहीर केलेल्या स्क्वॉडमध्ये कोण-कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे, ते जाणून घेऊयात…
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धेत एकूण 10 संघ 45 दिवस 48 सामने खेळणार आहेत. यातील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघात खेळला जाणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी याच मैदानावर खेळला जाणार आहे.
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 10 संघांचे स्क्वॉड
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, मार्नस लॅब्युशेन, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क.
इंग्लंड
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस एटकिंसन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वूड, ख्रिस वोक्स.
नेदरलँड
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सीब्रँड एंजेलब्रेच.
न्यूझीलंड
केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, विल यंग.
पाकिस्तान
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.
दक्षिण आफ्रिका
टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएट्जी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एंडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी व्हॅन डर डुसेन, लिजाद विलियम्स
श्रीलंका
दसून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुशल परेरा, पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, महीश थीक्षणा, दुनिथ वेललागे, कसून रजिथा, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.
ट्रॅव्हेलिंग रिझर्व: चमिका करुणारत्ने
अफगाणिस्तान
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन-उल-हक.
बांगलादेश
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शान्तो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराज, नसुम अहमद, महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद , शोरिफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब. (know all 10 teams list of odi world cup 2023 know here)
हेही वाचा-
भारतीय संघाला घाम फोडणाऱ्या ‘त्या’ दोघांना कमिन्सने दिले विजयाचे श्रेय; म्हणाला, ‘त्यांच्यामुळे…’
‘इथल्या लोकांनी आमचे…’, विश्वचषकासाठी भारतात दाखल झाल्यानंतर बाबर आणि रिझवानची लक्षवेधी प्रतिक्रिया