ऑस्ट्रेलियात नुकतेच पुरूष क्रिकेट संघाचा टी20 विश्वचषक पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली. याची सुरुवात आता झाली असून, बीसीसीआयने संपूर्ण निवड समितीच अध्यक्षांसह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआयने लगेच नव्या निवडसमितीसाठी अर्ज देखील मागवले आहेत. या नव्या निवडकर्त्यांच्या मुख्य जबाबदारी कोणत्या असतील ते पाहू.
सर्वोत्तम संघ निवडणे ही त्यातील महत्वाची आणि पहिल्या क्रमांकाची जबाबदारी असणार आहे. त्यानंतर मजबूत संघ (बेंच स्ट्रेंथ) तयार करणे याचाही त्यात समावेश आहे. संघनिवडीसाठी देशांतर्गत स्पर्धाही महत्वाच्या ठरतात. अशावेळी नव्या निवडकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय खेळाबरोबरच देशांतर्गत सामने पाहण्यासाठी प्रवास करणे आवश्यक आहे. आता प्रत्येक संघासाठी वेगळा कर्णधार निवडण्याची आणि संघ निवडीबाबत माध्यमांना सामोरे जाण्याचीही तयारी निवडकर्त्यांनी करावी.
🚨NEWS🚨: BCCI invites applications for the position of National Selectors (Senior Men).
Details : https://t.co/inkWOSoMt9
— BCCI (@BCCI) November 18, 2022
टी20 विश्वचषकातील पराभवामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आणि आपला पहिला कठोर निर्णय शुक्रवारी (18 नोव्हेंबर) घेतला. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेत असल्याचे बीसीसीआयने म्हटले. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा हे होते. तर, उत्तर विभागाचे प्रतिनिधी म्हणून हरविंदर सिंग, पूर्व विभागाचे प्रतिनिधी देवाषिश मोहंती व दक्षिण विभागाचे प्रतिनिधी सुनील जोशी यांचा या निवड समितीत समावेश होता. पश्चिम विभागाचे प्रतिनिधी ऍबे कुरूविला यांचा कार्यकाळ या वर्षाच्या सुरुवातीला संपला होता. त्यानंतर ती जागा रिक्त होती.
निवड समिती सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्याऱ्यांसाधी अटीही बोर्डने सांगितल्या आहेत. अर्ज करणारा व्यक्ती भारताचा माजी क्रिकेटपटू असणे आवश्यक आहे. त्याने सात कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने खेळले असावे. किंवा 10 वनडे व 20 प्रथम श्रेणी सामने खेळणे गरजेचे आहे. तसेच, सदर उमेदवार हा पाच वर्षांपूर्वी क्रिकेट मधून निवृत्त झालेला असावा. या सर्व गटात बसणारा उमेदवारच अंतिम मुलाखतीसाठी पात्र ठरेल. सर्व उमेदवारांना आपला अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 28 नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत देण्यात आली आहे. Knowing the responsibilities of the new selectors of Team India, BCCI released the list
नवीन निवडकर्त्यांची मुख्य जबाबदारी:
1) योग्य आणि पारदर्शक पद्धतीने शक्य तितका सर्वोत्तम संघ निवडा
२) मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करा
३) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळ पाहण्यासाठी प्रवास करा
4) संघ निवडीवर मीडियाला संबोधित करा
5) प्रत्येक प्रकारच्या संघासाठी कर्णधाराची नियुक्ती करणे
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका क्रिकेटमध्ये सनथ जयसूर्या, वसीम अक्रम यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
द्रविडच्या बचावासाठी उतरला अश्विन! रवी शास्त्रींना म्हणाला, ‘टी20 विश्वचषकासाठी त्यांनी किती मेहनत…’