मागील काही दिवसात भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. यात वेगवान गोलंदाजांचे मोठे योगदान राहिले आहे. यामध्ये युवा गोलंदाज मोहम्मद सिराजनेही आपल्या शानदार कामगिरीने छाप पाडली आहे. आता भारताचा कर्णधार विराट कोहलीकडूनही त्याचे कौतुक होत आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा असा विश्वास आहे की, युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज त्याच्या सारखाच तडफदार आहे, जो मैदानावर न घाबरता गोलंदाजी करतो. कोहली म्हणाला की, सिराज फलंदाजांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना बाद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.
लीड्स कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस आधी पत्रकारांशी बोलताना कोहली म्हणाला, “मोहम्मद सिराजच्या या प्रकारच्या गोलंदाजीमुळे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, कारण मी त्याला जवळून पाहिले आहे. तो एक असा खेळाडू आहे की, त्याच्याकडे आधीपासूनच कौशल्य होते. या कौशल्याला पाठिंबा देण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाची गरज होती. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो आत्मविश्वास मिळाला.”
कर्णधार कोहली म्हणाला की, “जेव्हा तो मैदानावर येतो तेव्हा त्याला माहित असते की, तो कोणालाही कधीही बाहेर काढू शकतो आणि त्याच्या खेळावरचा विश्वास एका नवीन स्तरावर पोहोचला आहे. ज्यामुळे तो सर्वोत्तम खेळाडू बनू शकला आहे. त्याचे परिणाम दिसत आहेत.”
“त्याला स्वतः च्या रंगात रंगलेले पाहून मला प्रचंड आनंद झाला आहे. तो असा गोलंदाज होईल जो डोळ्यांत डोळे घालून खेळेल आणि खेळाडूंना बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल आणि जो घाबरणार नाही, तो मागे हटणार नाही.”
सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या जोडीवरही कर्णधार विराट कोहलीही खूप प्रभावित झाला आहे. रोहितने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटींच्या चार डावांमध्ये ३६, १२, ८३ आणि २१ धावा केल्या आहेत. तर राहुलने ८४ , २६, १२९ आणि ५ धावा केल्या आहेत.
कोहली म्हणाला की, “जेव्हा तुम्ही परदेशी भूमीवर खेळता, तेव्हा सलामीच्या जोडीचे संयोजन हे सर्वात महत्त्वाचे पैलू आहे. त्यामुळे राहुल आणि रोहित शर्मा यांनी केलेली कामगिरी विलक्षण आहे आणि आम्हाला आशा आहे की, ते असेच खेळत राहतील. ”
लीड्स कसोटी २५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेचा ‘जादुई गोलंदाज’ राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात! जागतिक टी-20 क्रमवारीत आहे अव्वलस्थानी
अरे कोहली, तुला नेमकं झालंय काय? ‘रनमशीन’बाबत ही गोष्ट वाचून हैराण व्हाल






