मुंबई | भारताने विंडीजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. काल भारताने ब्रेबाॅनवर झालेल्या सामन्यात विंडीजचा २२४ धावांनी पराभव केला.
या सामन्यानंतर बोलताना कर्णधार विराट कोहलीने अंबाती रायडूच्या खेळीचे जोरदार समर्थन केले.
“रायडूला २०१९ विश्वचषकापर्यंत पाठींबा देण्याची गरज आहे. या सामन्यात मिळालेल्या संधीचा त्याने जोरदार फायदा घेतला. तसेच खेळाला तो चांगला समजतो. एक बुद्धीमान खेळाडू या क्रमांकावर खेळतो याचा आनंद आहे, ” असे विराट यावेळी म्हणाला.
रायडूने या मालिकेत ४ सामन्यांत ७२.३३च्या सरासरीने २१७ धावा केल्या आहेत.
भारतासमोर चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा मोठा प्रश्न उभा होता. तो रायडूमुळे काही अंशी तरी सुटला आहे. यावर्षी भारताकडून ह्या क्रमांकावर ६ फलंदाजांनी फलंदाजी केली आहे. त्यात रायडू सर्वाधिक यशस्वी ठरला आहे.
मात्र सध्या भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार एमएस धोनीचे अपयश सर्वाधिक चर्चेचा विषय आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: जमशेदपूरविरुद्ध ब्लास्टर्सने मिळवला एक गुण
–कोणत्याही संघाला न जमलेला पराक्रम भारतीय संघाने केला
–ज्या खेळाडूसोबत मैदानावरच झाले होते भांडण त्यानेच दिल्या शतकी खेळीच्या रायडूला शुभेच्छा