इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महाकुंभमेळा आता फक्त आठवडाभर दूर आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच अनेक संघांना धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहे. या संघांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही समावेश आहे. आधीच कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर हा पाठीच्या दुखापतीने ग्रस्त आहे. त्यानंतर आता वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हादेखील दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कोलकाताच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
खरं तर, न्यूझीलंड संघ श्रीलंका दौऱ्यावर 25 मार्चपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. यापूर्वीच लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाबाहेर आहे. फर्ग्युसनला फक्त याच सामन्यात भाग घ्यायचा होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या देशातून रवाना होणार होता.
लॉकी फर्ग्युसन याची श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड (Sri Lanka vs New Zealand) संघातील वनडे मालिकेपूर्वी फिटनेस चाचणी करण्यात आली. त्यात तो पास झाला नाही. फर्ग्युसनला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे बाहेर पडावे लागले आहे. अद्याप न्यूझीलंडने त्याच्या जागी पहिल्या वनडे सामन्यासाठी कोणत्याही खेळाडूच्या नावाची घोषणा केली नाहीये.
केकेआरचा 2 एप्रिलला पहिला सामना
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाच्या अभियानाची सुरुवात 2 एप्रिलपासून पंजाब किंग्स संघाविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केकेआर (KKR) संघाला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या जागी नवीन कर्णधाराची घोषणादेखील करावी लागेल. कारण, श्रेयस पाठीच्या दुखापतीमुळे हंगामाला मुकण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, लॉकी फर्ग्युसन याच्याबाबत बोलायचं झालं, तर तो मागील हंगामाचे विजेतेपद जिंकणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. त्याला केकेआरने गुजरातशी ट्रेड करून आपल्या ताफ्यात सामील केले होते. फर्ग्युसनने मागील हंगामात ताशी 157.3 किमीच्या वेगाने सर्वात वेगवान चेंडू फेकला होता. त्यासाठी त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले होते. (kolkata night riders fast bowler lockie ferguson has been injured ahead of ipl 2023 know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात! ‘या’ वादळी फलंदाजाने ठोकला दावा
बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांचा भीमपराक्रम! वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी