पुणे: ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात रित्सा कोंडकर, सृष्टी सूर्यवंशी यांनी तर, मुलांच्या गटात अझलन शेख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात पाचव्या मानांकित रित्सा कोंडकरनेअव्वल मानांकित स्वर्णिका रॉयचा 6-2, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. सहाव्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने चौथ्या मानांकित रितिका डावलकरचा 6-1, 3-6, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव केला. शिबानी गुप्तेने मायरा टोपणोचा 6-2, 6-1 असा तर, दुसऱ्या मानांकित जान्हवी चौगुलेने आठव्या मानांकित काव्या तुपेचा 6-1, 6-4 असा पराभव केला.
मुलांच्या गटात अव्वल मानांकित स्मित उंद्रेने आपली विजयी मालिका कायम ठेवत क्वालिफायर अंशुल पुजारीचा 6-1, 6-3 असा तर, बिगरमानांकीत अझलन शेखने चौथ्या मानांकित रौनक हरियानीचा 6-3, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी): मुले:
स्मित उंद्रे[1]वि.वि.अंशुल पुजारी 6-1, 6-3;
आरव पटेल[3]वि.वि.हर्ष परिहार 6-3, 6-1;
अझलन शेख वि.वि.रौनक हरियानी[4] 6-3, 6-1;
नमिश हूड वि.वि.अथर्व डाकरे 6-0, 6-3;
मुली:
रित्सा कोंडकर[5]वि.वि.स्वर्णिका रॉय[1] 6-2, 6-2;
सृष्टी सूर्यवंशी[6]वि.वि.रितिका डावलकर[4] 6-1, 3-6, 6-3;
शिबानी गुप्ते वि.वि.मायरा टोपणो 6-2, 6-1;
जान्हवी चौगुले[2]वि.वि.काव्या तुपे[8]6-1, 6-4.
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विनची फलंदाजी ऍक्शन पाहून व्हाल लोटपोट, याआधी कधीही पाहिला नसेल असा बॅटिंग स्टान्स
सासवड एफसीचे जुन्नरविरुद्ध आठ गोल