---Advertisement---

बंधुप्रेम! छोट्या भावाची मोठ्या भावाकडून तोंडभरुन स्तुती, पाहा काय म्हणाला

On: शनिवार, जून 5, 2021 6:36 PM
---Advertisement---

कृणाल पांड्या व हार्दीक पांड्या हे दोघे इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाचा एक महत्वपूर्ण भाग आहेत. या दोघांनी आपल्या संघासाठी अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे व संघाला सामने जिंकून दिले आहेत. मुंबई इंडियन्सच्या यशामध्ये या दोघांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. इतरांकडून तर त्यांच्या कामगिरीची प्रशंसा होतेच. परंतु पंड्या बंधूही एकमेकांवर स्तुतीसुमने उधळताना दिसून येतात. नुकतेच मोठा भाऊ कृणालने छोटा भाऊ हार्दिकचे कौतुक केले आहे.

कृणालचे हार्दीकसाठी ट्विट
कृणालने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हार्दीकसोबतचे अप्रतिम फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोंच्या खाली त्याने हार्दिकची वाहवा सुद्धा केली आहे. कृणालने लिहले आहे की, ‘हार्दीकने मला सदैव चांगले बनण्यासाठी पुश केले आहे.’

कृणालची आयपीएल २०२१ मध्ये निराशाजनक कामगिरी
कृणालने आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई संघाकडून सुंदर असे प्रदर्शन केले आहे. परंतु आयपीएल २०२१ स्थगित होण्यापुर्वी कृणाल जास्त चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला नाही. त्याने ७ सामने खेळताना अवघ्या १०० धावा ३ विकेट्स घेतल्या होत्या.

येत्या काही महिन्यात यूएईमध्ये आयपीएल २०२१चे पुढील सत्र खेळले जाणार आहे. या सत्रात हार्दीक व कृणालकडून मुंबई इंडियन्स व त्यांच्या चाहत्याना खूप अपेक्षा असतील. त्यांनी चांगले प्रदर्शन करावे आणि मुंबई संघाला सहावा आयपीएल चषक जिंकून द्यावा अशी अपेक्षा सर्वांना असेल. मुंबई इंडियन्स संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांना ७ सामन्यांतील ४ सामने जिंकत फक्त ८ गुण मिळवता आले आहेत.

पांड्या बंधूचे लवकरच भारतीय संघात पुनरागमन
कृणाल व हार्दीक या दोघांचे भारतीय संघाच्या श्रीलंकामध्ये होणाऱ्या मालिकेमध्ये भारतीय संघाकडून पुनरागमन होऊ शकतो. अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्तितीमध्ये या खेळाडूंवर अधिक जबाबदाऱ्या असतील. त्यांना भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यावर जागा देण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

बापरे! तब्बल एवढ्या कोटींचा मालक आहे ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह

खेळासाठी काहीही! जेव्हा पाण्याने भरलेल्या खेळपट्टीवर सचिनने केली होती फटकेबाजी, व्हिडिओ व्हायरल

पहिली टेस्ट चॅम्पियनशीप तोच संघ जिंकेल जो ‘ही’ गोष्ट उत्तम करेल, ब्रेट लीने मांडले मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---