---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पंतच्या जागेवर संधी मिळालेल्या केएस भरतची कशी राहिलीये कामगिरी, घ्या जाणून

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 10:27 PM
---Advertisement---

न्यूझीलंड संघ पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात त्यांना भारतीय संघाविरुद्ध ३ टी२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. शुक्रवारी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघात यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत याचीही वर्णी लागली आहे.

या कसोटी मालिकेसाठी नियमित यष्टीरक्षक रिषभ पंतला विश्रांती दिली असल्याने भरतला त्याच्याऐवजी संधी देण्यात आली आहे. त्याच्याशिवाय वृद्धिमान साहा हा देखील यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात आहे.

केएस भरतने केलंय प्रभावित
केएस भरत गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या कामगिरीने प्रभावित करत आहे. तसेच त्याने अनेकदा भारत अ संघाकडून खेळतानाही त्याच्या कामगिरीने लक्ष वेधले होते. तो याचवर्षी मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठी देखील राखीव खेळाडूंमध्ये होता. तसेच तो काही दिवसांपूर्वी आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना देखील चर्चेत आला होता. तो या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला. हा त्याचा पदार्पणाचा आयपीएल हंगाम ठरला.

त्याने बेंगलोरकडून या हंगामात ८ सामने खेळताना ३८.२० च्या सरासरीने १९१ धावा केल्या. यामध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केलेल्या नाबाद ७८ धावांच्या खेळीचाही समावेश आहे.

केएस भरतची कारकिर्द
केएस भरतची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही चांगली राहिली आहे. आंध्रप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या २८ वर्षीय केएस भरतने ७८ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३७.२४ च्या सरासरीने ४२८३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ९ शतकं आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर एक त्रिशतक देखील आहे. ३०८ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. तसेच त्याने २७० झेल घेतले असून ३१ यष्टीचीत देखील केले आहेत.

याशिवाय त्याने ५१ अ दर्जाचे सामने खेळले असून १३५१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतकांचा आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्यानावावर ५४ झेल आणि ११ यष्टीचीत आहेत. त्याचबरोबर त्याने ६१ टी२० सामने खेळले असून त्याने ५ अर्धशतकांसह १०५० धावा केल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत देखील त्याने चांगली कामगिरी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

आझमचा विराटच्या आणखी एका विश्वविक्रमाला धक्का! ‘या’ यादीत मिळवला अव्वल क्रमांक

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळलेल्या विहारीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी लागली वर्णी, पाहा संपूर्ण संघ

दे घुमा के! डेविड वॉर्नरने दोन टप्पे पडून आलेल्या चेंडूवर ठोकला षटकार, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---