---Advertisement---

आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने भारतीय सेनेसाठी उचलले मोठे पाऊल…

On: गुरूवार, मार्च 28, 2019 7:36 PM
---Advertisement---

फेब्रुवारीमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून जवानांबद्दल आदर आणि प्रेम वाढलेले दिसून येत आहे. या दहशतकवादी हल्ल्यात 44 सीआरपीफचे जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच जशी जमेल तशी मदत या शहीद जवानांच्या कुटुंबाला देशभरातून करण्यात येत आहे.

यात भारतीय क्रिकेट जगतही मागे नाही. काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या उद्घाटनावर होणाऱ्या खर्चाचा निधी शहीद जवानांच्या कुटुंबाला मदत म्हणून देण्यात आले. त्यामुळे यावेळी आयपीएल उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता.

तसेच चेन्नई सुपर किंग्जनेही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातील तिकीटांची कमाई शहीद जवानांच्या कुटुंबाला दिली आहे.

आता कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन(केएससीए) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि भारती सिमेंट यांच्यासह  भारतीय सेनाच्या 60 जवानांना चिन्नास्वामी स्टेडियमवर 28 मार्च ते 4 मेपर्यंत होणाऱ्या आयपीएलच्या 7 सामन्यांसाठी आमंत्रित करणार आहे.

या वृत्ताला केएससीएने प्रसिद्धी पत्रक जाहीर करत पुष्टी दिली आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की केएससीए, आरसीबी आणि भारती सिमेंट लष्करी अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी 20 तिकिटे प्रायोजित करतील.

केएससीएने म्हटले आहे की ‘जवान हे आपल्या देशाचा आभिमान आहेत. ते आपल्या स्वातंत्र्याचे प्रेषित आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि भारती सीमेंट्स यांच्या सहकार्याने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) ने 28 मार्च ते 4 मे दरम्यान एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएलच्या 7 सामन्यांसाठी प्रत्येकी 60 जवानांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.’

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला सामना आज(28 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०१९: दिल्लीच्या ट्रेनिंग सेशनमध्ये सौरव गांगुलीने केली ‘दादा’ फलंदाजी, पहा व्हिडिओ

मुंबई इंडियन्सच्या संघात या नवीन खेळाडूचा झाला समावेश, जाणून घ्या कारण

आयपीएल २०१९: आज पंजाबकडून पदार्पण केलेला कोण आहे वरुण चक्रवर्ती…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment