दोन वर्षापूर्वीपर्यंत भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक मानला जायचा. त्याच्या फिरकी गोलंदाजीमुळे विरोधी संघातील मोठमोठ्या फलंदाजांना घाम फुटायचा. त्याने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघासाठी आणि आयपीएल फ्रँचाजझी कोलकाता नाईट रायडर्ससाठी अनेक सामने जिंकले आहेत. मात्र, आता तो अलीकडच्या काळात तो जास्त सामन्यांमध्ये खेळताना दिसला नाही. त्याला केकेआर संघाकडून सामने खेळण्यासाठी संधी मिळत नसल्यामुळे त्याने आकाश चोप्रासोबत बोलताना या गोष्टीची खंत व्याक्त केली आहे.
कुलदीपने आकाश चोप्राशी बोलताना सांगितले की बेंचवर बसून त्याला खूप दु:ख वाटते आणि एक वेळ अशी आली होती की, त्याला त्याच्या प्रतिभेबद्दल शंका येऊ लागली होती. त्याने आकाश चोप्राला दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या पाच गोष्टींविषयी खंत व्यक्त केली आहे.
कुलदीपने सांगितले की आयपीएलमध्ये तुमच्यासोबत चर्चा केली जात नाही. मागच्या वेळी माझ्याशी चर्चा केली गेली नाही आणि मला सामन्यात खेळवलेही गेले नाही. मी थोडा हैरान होतो. असे वाटते जेसे त्यांना तुमच्यावर विश्वास नाहीये. असे वाटते की, तुम्ही सामना जिंकूच शकत नाही. जेव्हा पर्याय जास्त असतान तेव्हा अशा गोष्टी घडतात. केकेआरकडे फिरकी गोलंदाजांचे अनेक पर्याय आहेत.
पुढे कुलदीपने म्हणाला, विदेशी कर्णधारासोबत खूप कमी बोलणे होते, तो तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. मात्र, भारतीय कर्णधारासोबत तुम्ही स्पष्टपणे बोलू शकता, विचारू शकता. रोहित शर्मासारख्या कर्णधाराला तुम्ही विचारू शकता की, चांगल्या प्रदर्शनासाठी मला काय करावे लागेल आणि संघात माझी काय भूमिका आहे.
आयपीएलमध्ये ४५ सामने खेळलेला कुलदीप म्हणाला मागच्या वर्षापर्यंत मी माझ्या गोलंदाजीविषयी जास्त विचार करत होतो. मला स्वत:वर शंका वाटत होती, खूप गोष्टी डोक्यात येत होत्या. मी नेहमी चांगेल प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. कधी-कधी तुम्हाला माहित असते की, तुम्ही खेळले पाहिजे. मी बाहेर बसले नाही पाहिजे, पण तुम्हाला कारण माहित नसते की, तुम्हा बेंचवर का बसला आहात.
संघात पुनरागमन करणे सर्वात अवघड असते, हे पदार्पण सामन्यापेक्षा कठीण काम आहे. जेव्हा तुम्ही सतत खेळत असता, तेव्हा एवढा दबाव नसतो, पण पुनरागमन केल्यानंतर प्रत्येक सामन्यात तुम्ही विचार करता की, कशाप्रकारे विकेट्स घेऊ. बाहेर बसणे खुप कठीण आहे. जेव्हा फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवरही संधी मिळत नाही. तेव्हा मनात विचार येतो की, येथे नाही तर कुठे संधी मिळणार, असंही कुलदीपने म्हटले आहे.
याशिवाय पुढे कुलदीप म्हणाला श्रीलंका दौरा खूप महत्वाचा होता. इंग्लंविरुद्ध मालिका चांगली गेली नव्हती. मला वाटत होते की, पदार्पण करत आहे. मात्र, जे खेळत होते तेही चांगेले प्रदर्शन करत होते. मात्र, मी माझ्या सरावावर लक्ष देत होतो. मला जेथे संधी मिळाली, त्यात मला जास्त गोलंदाजीची मिळाली नाही. श्रीलंका दौऱ्याआधी मला राहुल सरांनी सांगितले होते की, तुला पुढचा विचार नाही करायचा. जे होईल पाहिले जाईल, पण आता या सामन्यावर लक्ष दे. जे नियोजन केले आहे, त्याच्यावरच काम कर. तेथून मला थोडा आत्मविश्वास मिळाला.
कुलदीपला टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठीही भारतीय संघात संधी मिळालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ज्यादाचा वनडे किंवा टी२० सामना खेळण्यास तयार, पण मुद्दा हा नाही, तर…’, गांगुलीचे मोठे भाष्य
पीसीबीच्या अध्यक्षपदी निवड होताच रमीज राजा यांचा मोठा निर्णय, क्रिकेटपटूंच्या वेतनात २५० पटींनी वाढ
‘दुबईला लवकर यावे लागणे दुर्भाग्यपूर्ण, पण…’ मँचेस्टर कसोटी रद्द होण्याबद्दल विराटने सोडले मौन