इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर प्रमाणे भारतातील चायनामन कुलदीप यादव याचेसुद्धा असे म्हणणे आहे की त्याच्यात भविष्यवाणी करण्याची क्षमता आहे आणि त्यात दुसऱ्या एकदिवसीय हॅट्रिकचा समावेश आहे.
कुलदीप हा देशातील एकमेव गोलंदाज आहे ज्याने वनडेमध्ये दोन हॅट्रिक घेतल्या आहेत. त्याने २०१७मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदा हॅट्रिक घेतली होती. तर मागीलवर्षी डिसेंबरमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरी हॅट्रिक घेतली.
याबद्दल आयपीएलची फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या माहितीनुसार कुलदीपने म्हटले आहे की, ‘तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण मी दुसरी हॅट्रिक घेतली त्या दिवशी मी आईला सांगितले होते की मी हॅट्रिक घेईल.’
तो म्हणाला, ‘बऱ्याचदा मी जे बोललो ते खरं झालं. मला असे वाटते की कधीकधी असे होत असते आणि जेव्हा आम्ही वेस्ट इंडिजविरूद्ध फलंदाजी करीत होतो तेव्हा मला मी हॅट्रिक घेईल असे वाटत होते. ज्या गोष्टी मी आखल्या त्या घडल्या.’
ट्रेंडिंग लेख –
जर ही गोष्ट घडली नसती तर अँडरसनच्या आधीच ‘या’ ३ वेगवान गोलंदाजांनी घेतल्या असत्या कसोटीत ६०० विकेट्स
रंगअंधत्व असतानाही मोठी कारकिर्द घडवणाऱ्या ख्रिस राॅजर्सबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी क्रिकेटमध्ये एका योग्यासारखा, या भारतीय दिग्गजाने व्यक्त केले मत
मैदानावर उतरताच ‘हा’ खेळाडू म्हणतोय, आता तुरुंगातून सुटल्यासारखे वाटत आहे…
शोएब अख्तरची ‘या’ खेळाडूवर कडाडून टीका; म्हणाला, तो हरवलेल्या गायीसारखा…