भारताचा चायनामन गोलंदाज कुलदिप यादवने मुंबईत झालेल्या (29 आॅक्टोबर) चौथ्या वनडे सामन्यात तीन विंडीजच्या फलंदाजांना बाद केले. यामुळे यावर्षी त्याचे 18 वनडे सामन्यात 44 विकेट्स झाल्या आहेत. तसेच तो यावर्षी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यामध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
पहिल्या स्थानावर अफगानिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान आहे. त्याने 20 वनडे सामन्यात 48 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदिपने याबाबतीत इंग्लंडच्या आदिल रशीदला मागे सोडले आहे. रशीदने 24 वनडे सामन्यात 42 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच कुलदिपकडे राशिदला पिछाडीवर टाकण्याची एकच संधी आहे. 1 नोव्हेंबरला होणारा विंडीज विरुद्धचा वनडे सामना हा त्याचा यावर्षीचा शेवटचा सामना असून त्याला राशिदच्या पुढे जाण्यासाठी अजून पाच विकेट्सची गरज आहे.
2017मध्ये भारताकडून वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या कुलदिपने 32 सामन्यात 65 विकेट्स घेतल्या होत्या. आतापर्यंत पदार्पण करणारा कोणताही गोलंदाज एवढे विकेट घेण्यात यशस्वी ठरला नाही. तर राशिदने 2017ला 23 वनडेमध्ये 55 विकेट्स घेतल्या होत्या.
कुलदिपने भारताबाहेर 22 वनडे सामने खेळले असून 47 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच यावर्षी भारताबाहेर 15 वनडे सामन्यात 36 विकेट्स घेण्यात त्याला यश आले आहे. त्याने एक वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरीही केली आहे. याचबरोबर कुलदिपने भारतात 3 वनडे सामन्यात गोलंदाजी करताना 8 विकेट्स घेतल्या
2018ला वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पहिले पाच गोलंदाज:
48 विकेट्स – राशिद खान (अफगानिस्तान) 20 सामने
44 विकेट्स – कुलदिप यादव (भारत)18 सामने
42 विकेट्स – आदिल रशीद (इंग्लंड) 24 सामने
37 विकेट्स – मुजीब उर रहमान (अफगानिस्तान) 20 सामने
30 विकेट्स – टेंडई चतारा (झिम्बाब्वे) 21 सामने
महत्त्वाच्या बातम्या:
–विंडीज संघाचे केरळात नारळपाणी देत ढोल ताशांच्या निनादात जंगी स्वागत, पहा व्हिडिओ
–कार्तिक आणि पंत या दोघांपेक्षा धोनीच भारी…तरीही टी२०मधुन वगळले
–देश आधी… रोहितने चाहत्यांना मैदानातूनच दिला संदेश, पहा व्हिडीओ