भारतात सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. रोज लाखोंमख्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. असे असतानाच दुसरीकडे लसीकरणही सुरु आहे. सरकारने १८ वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरु केले आहे. त्यामुळे सध्या अनेक भारतीय क्रिकेटपटू लसीचा पहिला डोस घेताना दिसत आहेत. नुकतेच काहीदिवसांपूर्वी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने देखील लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, त्यानंतर तो मोठ्या वादात सापडला आहे.
झाले असे की कुलदीपने शनिवारी कोविड-१९ लसीचा पहिला डोस घेतला. पण हा डोस त्याने हॉस्पिटलमध्ये न घेतला एक गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्यावर लसीकरण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. तसेच असेही समजत आहे की कानपूर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत
शनिवारी(१५ मे) कुलदीपने ट्विटरवर लस घेतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो एका लॉनमध्ये खुर्चीवर बसलेला दिसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की ‘जेव्हा संधी मिळेल तेव्हा लगेचच लस टोचून घ्या. सुरक्षित राहा कारण कोविड-१९ विरुद्धच्या लढाईल एकजूट रहाणे आवश्यक आहे.’
जब भी मौका मिले तुरंत टीका लगवाएं। सुरक्षित रहें क्योंकि covid19 के खिलाफ लड़ाई में एकजुट होने की आवश्यकता है 🙏🏻 pic.twitter.com/6YSHyoGmWM
— Kuldeep yadav (@imkuldeep18) May 15, 2021
त्याच्या या ट्विटनंतर त्याने नियम मोडल्याची चर्चा सुरु झाली. माध्यमांतील वृत्तानुसार कुलदीपने गोविंद नगरमधील जागेश्वर हॉस्पिटलमध्ये लस घेण्याऐवजी त्याने कानपूरमधील नगर निगम गेस्ट हाऊसमध्ये लसीचा डोस घेतला. याबद्दल एका सुत्राने नाव न सांगण्याच्या अटीवरुन माहिती दिली आहे.
जेव्हा स्वत: पंतप्रधान, मुख्यमंत्री हे हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घेत असतील तर कुलदीपला व्हिआयपीएल ट्रिटमेंट का असा सवाल अनेकांची खडा केला आहे. त्यानंतर कानपूर जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना या प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कुलदीपला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान नाही
भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला जूनमध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून त्याच कुलदीपला संधी मिळालेली नाही. त्यामुळे बरीच चर्चाही झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“हा तुमच्या काकाचा संघ नाही की, तुम्ही प्रत्येक फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाजी कराल”