भारतीय संघाचा युवा स्टार गोलंदाज कुलदीप यादव हा गेल्या कित्येक महिन्यांपासून भारतीय संघासोबत प्रवास करत आहे परंतु त्याला संघात खेळण्याची संधी मिळत नाही आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. यामुळे आर. अश्विन सोबत फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव याचे नाव सर्वात पुढे होते. पण पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी शाहबाज नदीम याला संघात संधी दिली गेली.
संधीच्या प्रतिक्षेत कुलदीप यादव
कुलदीप यादवने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सिडनी मध्ये खेळला होता. त्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध मालिका खेळली होती. या मालिकेतून कुलदीप यादव याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यांनतर भारतीय संघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला तरी सुद्धा कुलदीप यादवला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.
चाहत्यांनी व्यक्त केले दुःख
कुलदीप यादवला संघात संधी न मिळाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहलीला, कुलदीप यादवची संघात निवड न केल्यामुळे प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला होता की, “आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे ही ऑफ स्पिनर आहेत. अशात जर कुलदीप यादव याला संधी देण्यात आली असती तर तीन गोलंदाज सारखेच झाले असते.”
कुलदीप यादवच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला रोष
कुलदीप यादवचे बालपणीचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी सुद्धा कुलदीपला संघात स्थान न दिल्यामुळे दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “कुलदीप सतत संघाबरोबर प्रवास करत आहे. तरीसुद्धा संघ व्यवस्थापक त्याला संधी नाही देत आहेत. संघ त्याच्या कामगिरीची दखल नाही घेत आहे. त्याला सामान्य क्रिकेटपटू समजत आहेत. मला वाईट वाटत आहे कारण जडेजा सुद्धा फिट नाहीये आणि भारतीय संघ परदेशात नाही खेळत आहे. जर कुलदीप इतर देशासाठी खेळत असता, तर तो कमीत कमी ५० कसोटी सामने खेळलेला असता आणि कमीत कमी २०० विकेट्स त्याच्या नावे असत्या. परंतु तो भारतात खेळत आहे. इथे काही ही संभव आहे.”
पुढे ते म्हणाले, “संघ व्यवस्थापक कुलदीपला संधी नाही देत आहेत. यामुळे त्याच्यावरचा ताण आपोआप वाढणार आहे. प्रत्येकाला समान संधी दिली गेली पाहिजे. वॉशिंग्टन सुंदरला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी दिली जात आहे. शाहबाज नदीमला पण संधी दिली गेली. तर कुलदीप यादवला का नाही? कुलदीपने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ५ गडी बाद केले होते. त्यामुळे त्याला संधी दिली गेली पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या:
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत पुनरागमन करेल
विजय हजारे ट्रॉफी २०२१ : या दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात, ६ शहरात खेळणार ३८ संघ
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल? हा खेळाडू करू शकतो कसोटी पदार्पण