पॅरिस सेंट जर्मेन संघाचा स्टार खेळाडू काइलियन मबाप्पे याला टूटो स्पोर्ट्स या वृत्तपत्राद्वारे देण्यात येणारा मनाचा ‘गोल्डन बॉय’ हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार वर्षातील सर्वोत्तम अंडर २१ खेळाडूला देण्यात येतो. या पुरस्कारासंबंधीची घोषणा या वृत्तपत्राने सोमवारी सकाळी केली.
या पुरस्काराच्या शर्यतीत त्याने बार्सेलोनाचा स्टार खेळाडू ओस्माने डेम्बले, मँचेस्टर युनिटेडचा मार्कस रॅशफोर्ड आणि मँचेस्टर सिटीचा गॅब्रियल जेसूस यांना मागे टाकले. हे खेळाडू अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिले.
मबाप्पे याचा मागील मोसम खूप चांगला गेला होता. मोनॅको संघासाठी खेळताना त्याने लीगमध्ये १५ गोल केले होते. त्याचबरोबर मोनॅको संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमी फायनल पर्यंत घेऊन जाण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. हा पुरस्कार मिळण्यासाठी त्याला सर्वाधीक २९१ मते मिळाली. तर बार्सेलोनाच्या डेम्बले याला १४९ मते मिळाली.
मागील वर्षी हा पुरस्कार पटकावणारा पोर्तोगालचा रेनेतो सांचेझ याला पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. मबाप्पेला हा पुरस्कार टूटो स्पोर्ट्सचे संपादक पाऊलो डी पाऊलो यांच्या हस्ते मोनॅको येथे सोमवारी संध्यकाळी देण्यात येणार आहे.
यदाकदाचित पणास माहिती नसेल तर:
# टूटो स्पोर्ट्स हा पुरस्कार २००३ सालापासून देत आहे. या पुरस्काराचा पहिला मानकरी हा राफाएल वॅन डर वॉर्ट हा डच फुटबॉलपटू ठरला होता.
# हा पुरस्कार मिळवणारे काही प्रसिद्ध खेळाडू, लियोनल मेस्सी (२००५), सेस फॅब्रीगास (२००६), इस्को (२०१२), पॉल पोग्बा (२०१३)