कोरोना व्हायरस दरम्यान लंका प्रीमियर लीगचे आयोजन करण्यास श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मंजुरी दिली होती. परंतु बोर्डानेच आता मोठा निर्णय घेत ही लीग नोव्हेंबर मध्यापर्यंत स्थगित केली आहे. या लीगची सुरुवात २८ ऑगस्टपासून होणार होती, तर या लीगचा अंतिम सामना २० नोव्हेंबर रोजी खेळला जाणार होता. पण सध्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता लीग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या लीगला सुरुवात होण्यापूर्वीच एलपीएल या लीगवर चाहत्यांनी निशाना साधला आहे. कारण या लीगमधील संघांची नावे आयपीएल संघासारखी ठेवली आहेत. जसे की, कोलंबो सुपर किंग्ज, जाफना सनरायझर्स. सोशल मीडियावर यूजर्सने म्हटले आहे की, नवीन नावे ठेवता आली नसती का, या आयपीएलच्या बी टीम वाटत आहेत.
यापूर्वी श्रीलंका बोर्डाने सांगितले की, लीगमध्ये ५ संघ कोलंबो सुपर किंग्ज, गाले लायन्स, कँडी रॉयल्स, जाफना सनरायझर्स आणि दांबुला कॅपिटल्स संघात सामने खेळले जाणार आहेत. सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा, दांबुलाच्या रंगगिरी, कँडी येथील पल्लेकल आणि हंबनटोटा येथील सूर्या वेदा महिंदा राजपक्षे स्टेडिअममध्ये होणार आहेत.
परंतु चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या नावावरून आपल्या संघांची नावे ठेवल्यामुळे चाहत्यांनी एलपीएल लीगला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Looks like LPL want some attention, now they can say their teams are trending based on the hashtags 😂(Chennai)ColomboSuperKings #CSK
(Gujarat not playing now) Galle Lions #GL
(Delhi) DambullaCapitals #DC
It would’ve been great if its (Kolkata) KandyKnightRiders #KKR#LPL https://t.co/EjCPfj8z5t
— Karthik Rao (@Cric_Karthikk) August 9, 2020
९३ आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळणार एलपीएलमध्ये
एलपीएलच्या यादीत इंग्लंडच्या २०१९ विश्वचषकात विजय संघाचा सदस्य असणारा वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट आणि न्यूझीलंडच्या टीम साऊदीसमवेत ९३ आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हाफिज आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन स्मिथही या लीगमध्ये खेळणार आहे.
अंतिम ११ मध्ये खेळणार ४ परदेशी खेळाडू
प्रत्येक फ्रंचायझी संघाला आपल्या संघात ६ परदेशी खेळाडू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आयपीएलप्रमाणेच एलपीएलमध्येही संघ अंतिम ११ मध्ये केवळ ४ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात खेळवतील.
या लीगमध्ये ९३ खेळाडूंव्यतिरिक्त ८ प्रशिक्षकही खेळण्यासाठी तयार झाले आहेत.
खेळाडूंसाठी आहे ८ ते ४५ लाख रुपयांचे बक्षिसे
श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंसाठी ४५ लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. अव्वल खेळाडूंसाठी बक्षिसांची रक्कम ही ३० ते ३८ लाख रुपयांपर्यंत असेल. ज्यूनियर खेळाडूंसाठी बक्षिसांची रक्कम ही ८ ते ३० लाख रुपये असेल तसेच परदेशी खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार ८ ते ४५ लाख रुपये मिळू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
-हसीन जहां म्हणते; बंगालमध्ये आहे म्हणून सुरक्षित आहे, ‘या’ राज्यात माझं काही खरं नव्हतं
-ब्रेट ली आला आरसीबीच्या मदतीला; म्हणतोय, आरसीबीवाल्यांनो हे काम करा, ट्रॉफी नक्की जिंकालं
-पाकिस्तानबरोबर खराब प्रदर्शनामुळे जेम्स अँडसरनचं करियर संपलं? पहा काय म्हणतोय स्वत: अँडसरन
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळाडूंकडून होऊ शकतात हे ५ बहुचर्चित विक्रम
-११ ऑगस्ट हा दिवस क्रिकेटसाठी कायमचं विशेष ठरला, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व
-ऍसिडिटीला एसटीडी म्हणणाऱ्या परंतू भारतीय क्रिकेटच्या संकटमोचक क्रिकेटरचे किस्से