कोलोंबो। आजपासून श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील आर प्रेमादासा स्टेडीयमवर आज होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यानंतर श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 ला सुरु होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
35 वर्षीय मलिंगा हा वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने वनडेमध्ये 225 सामन्यात 29.02 च्या सरासरीने 335 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेकडून त्याच्यापेक्षा केवळ मुथय्या मुरलीधरन(523) आणि चांमिंडा वास(399) यांनी अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच मलिंगा हा विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या एकूण गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने विश्वचषकात एकूण 56 विकेट्स घेतल्या आहेत. यातील 13 विकेट्स त्याने नुकत्याच इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषकात घेतल्या आहेत.
त्याचबरोबर विश्वचषकात दोन वेळा हॅट्रिक घेणारा मलिंगा हा एकमेव गोलंदाज आहे. त्याने 2007 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका विरुद्ध चार चेंडूत चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने 2011 च्या विश्वचषकात केनिया विरुद्ध हॅट्रिक घेतली होती.
तसेच अचूक यॉर्कर टाकणारा गोलंदाज म्हणून ओळख मिळवलेल्या मलिंगाने 2011 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो श्रीलंकेकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत होता.
Lasith Malinga will play his last ODI today!
What will you miss the most about the 🇱🇰 legend? pic.twitter.com/1oThdaxv1M
— ICC (@ICC) July 26, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पॅरा रेजिमेंटमध्ये ही जबाबदारी सांभाळणार एमएस धोनी
–प्रो कबड्डीच्या या सामन्यासाठी उपस्थित राहणार टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली
–टीम इंडियाच्या जर्सीवर ओप्पो ऐवजी आता दिसणार हे नाव