भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सज्ज होता. मात्र सिडनी क्रिकेट मैदानातील आकडेवारी पाहता भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय
पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
सिडनी येथे मागील 5 वनडेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाले विजय
ऑस्ट्रेलियामधील सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या मागील 5 वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. ही आकडेवारी लक्षात घेऊनच फिंचने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असावा.
भारताने सिडनीत यशस्वीपणे गाठले लक्ष्य
भारतीय संघाने 23 जानेवारी 2016 साली सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामना खेळला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 330 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने 49.4 षटकांत 331 धावा करत शानदार विजय मिळवला होता. या सामन्यात युवा भारतीय फलंदाज मनीष पांडेने 104 धावा करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी निभावली होती.
दुसऱ्या डावात फलंदाजी करूनही भारतीय संघाने सिडनी क्रिकेट स्टेडियमवर विजय मिळवला असल्याने ही भारतीय संघासाठी आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे.
भारतीय संघाच्या आत्मविश्वासात पडेल भर
शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातही भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करणार आहे. त्यामुळे 2016 ला सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला विजय लक्षात घेता या संघाच्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडेल.
भारताला 375 धावांचे आव्हान –
शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने भारताला पहिला वनडे सामना जिंकण्यासाठी 375 धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन फिंच (114) आणि स्टिव्ह स्मिथने (105) शतकी खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
जाळ धूर संगटच ! कांगारूकडून भारतीय गोलंदाजांची मनसोक्त धुलाई
“त्याच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही”, रोहितच्या अनुपस्थितीबाबत विराटचे मोठे विधान
बुमराहने यावर्षी घेतली फक्त एक विकेट, बाद होणाऱ्या फलंदाजाचे नाव एकूण वाटेल आश्चर्य