पुणे। अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर(सर) स्मृती करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत एस्.एस् अकादमी संघाने आदिनाथ क्रिकेट क्लब संघाचा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय मिळवला.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एस्.एस् अकादमी संघाने आदिनाथ क्रिकेट क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना राज पडवळ व जय पांडेच्या अचूक गोलंदाजीपुढे आदिनाथ क्रिकेट क्लब संघ 16.3 षटकात सर्वबाद 62 धावांत गारद झाला. अभिग्यान कुंडूच्या 14 तर मंथन काकडेच्या 11 धावांनी संघाच्या डावाला आकार दिला. 62 धावांचे लक्ष राज पडवळच्या नाबाद 20 तर हार्दिक धनावनीच्या 16 धावांसह एस्.एस् अकादमी संघाने केवळ 8.3 षटकात 3 गडी गमावत 64 धावा करून सहज पुर्ण करत स्पर्धेत पहिला विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरी करणारा राज पडवळ सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
आदिनाथ क्रिकेट क्लब- 16.3 षटकात सर्वबाद 62 धावा(अभिग्यान कुंडू 14(4, 2×4, 1×6), मंथन काकडे 11 (16, 1×4), राज पडवळ 2-9, जय पांडे 2-3, हार्दिक धनावनी 1-2, आशिष देशपांडे 1-7) पराभूत वि एस्.एस् अकादमी- 8.3 षटकात 3 बाद 64 धावा(राज पडवळ नाबाद 20(27, 3×4), हार्दिक धनावनी 16(16, 2×4), चैतन्य लांडगे 1-12, सुरज गुप्ता 1-14)
सामनावीर- राज पडवळ
एस्.एस् अकादमी संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.