लिजेंड्स लीग क्रिकेटच्या तिसऱ्या सीझनचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दिग्गजांची ही स्पर्धा यावर्षी 11 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान भारत आणि कतारमध्ये खेळली जाईल. स्पर्धेत एकूण 34 सामने खेळले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू या स्पर्धेत खेळतात.
लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सुरेश रैना, हरभजन सिंग, इरफान पठाण, आरोन फिंच, मार्टिन गुप्टिल, गौतम गंभीर, ख्रिस गेल, हाशिम आमला आणि रॉस टेलर सारखे 110 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू खेळताना दिसणार आहेत. लीगचे सह-संस्थापक आणि सीईओ रमण रहेजा म्हणाले, “गेल्या वर्षी 4 संघांवरून 6 संघांपर्यंत विस्तार केल्यानं लीग अधिक स्पर्धात्मक आणि मनोरंजक बनण्यास मदत झाली. यावेळी 34 सामने होतील आणि या हंगामात लीगमध्ये अधिक खेळाडू असतील.”
येथे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, लीजेंड्स लीगच्या तिसऱ्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं गेलं असलं, तरी अद्याप ठिकाणांची घोषणा करण्यात आलेली नाही. यावेळी सामन्यांची संख्या वाढली आहे. यावेळी भारत आणि कतारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या लीगमध्ये एकूण 34 सामने खेळवले जाणार आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो, लीजेंड्स लीगचा मागचा सीझन हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली मणिपाल टायगर्सनं जिंकला होता. गेल्या मोसमात या लीगचे सामने रांची, डेहराडून, जम्मू आणि विशाखापट्टनम येथे झाले होते. तेव्हा लीगला रेकॉर्डब्रेक प्रेक्षक मिळाले होते.
लिजेंड्स लीग क्रिकेट कमिशनर रवी शास्त्री म्हणाले की, “जागतिक दर्जाचं स्पर्धात्मक क्रिकेट नेहमीच स्वागतार्ह आहे. पूर्वीपेक्षा अधिक सामन्यांसह आणखी अधिक दिग्गज या लीगमध्ये सामील होतील. यामुळे मैदानावर आणखी धमाल अपेक्षित आहे. माझ्यासारख्या चाहत्याला हेच वाटतं. माझी हिच इच्छा आहे. लीगमध्ये लक्षणीय वाढ होत आहे आणि अनेक सकारात्मक बदलही होत आहेत. स्पर्धा कतारमध्ये झाली तर लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
पॅट कमिन्स नाही, टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू करेल ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व
ऋषभ पंत IPL 2024 खेळण्यासाठी फीट; मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा स्पर्धेतून बाहेर
सूर्यकुमार यादव IPL 2024 च्या पहिल्या दोन सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता