नुकताच यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला होता. आता सध्या सर्वत्र अबू धाबी टी१० लीग स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत रोज काही ना काही असे प्रकार घडत आहेत, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच काहीसा प्रकार शनिवारी (२० नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
शनिवारी (२० नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात अबू धाबी आणि नॉर्दर्न वॉरियर्स हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात इंग्लंड संघाचा विस्फोटक फलंदाज लीयाम लिविंगस्टनने तुफान फटकेबाजी करत एकाच षटकात ३५ धावा कुटल्या.
तर झाले असे की, ९ वे षटक सुरू असताना जोशूआ लिटिल गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील ३५ धावां पैकी ३२ धावा लीयाम लिविंगस्टनच्या बॅटमधून आल्या, तर ३ धावा गोलंदाजाने भेट स्वरूपात दिल्या. लीयाम लिविंगस्टनने षटकातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारले. तर शेवटच्या चार चेंडूंवर सलग ४ षटकार मारले. या विस्फोटक फलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Is Liam Livingstone is the perfect T10 batter?🤔👀#AbuDhabiT10 #InAbuDhabi #CricketsFastestFormat pic.twitter.com/Eyd9CeoFsM
— T10 Global (@T10League) November 20, 2021
या सामन्यात अबू धाबी संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटक अखेर १३५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये लीयाम लिविंगस्टनने २३ चेंडूंमध्ये ६८ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात नॉर्दर्न वॉरियर्स संघाला १११ धावा करता आल्या. हा सामना अबू धाबी संघाने २१ धावांनी आपल्या नावावर केला.
तसेच नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेत देखील लीयाम लिविंगस्टनने तुफान फटकेबाजी केली होती. त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार मारला होता. त्याने ११२ मीटर लांब षटकार मारला होता. तो चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ पाच कारणांमुळे न्यूझीलंड संघ भारतासमोर झुकला, सलामीवीरांनी पार पाडली महत्वाची भूमिका
लेकाची काळजी! शोएब मलिकची मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे टी२० मालिकेतून तडकाफडकी माघार