---Advertisement---

ऋतुराजप्रमाणेच ‘या’ भारतीय दिग्गजाने एका षटकात मारलेत सात चौकार, नाव ऐकून व्हाल हैराण

On: सोमवार, नोव्हेंबर 28, 2022 5:05 PM
Ruturaj Gaikwad and MS Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या संघातून बाहेर आहे. मात्र, सोमवारी (28 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये तो वादळी फलंदाजी करताना दिसला. सूर्यकुमारने या सामन्यातील एका षटकात तब्बल सात षटकार कुटले आणि अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज बनला. एका षटकात सात षटकार मारणारा सूर्यकुमार पहिला फलंदाज असला, तरी एका षटकात सात चौकार मात्र यापूर्वीही फलंदाजांनी मारले आहेत.

विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत आहेत. सोमवारी महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळाली. कर्णधार ऋतुराज गाकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या वादळी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 330 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने या सामन्यात एकूण 159 चेंडू खेळले आणि नाबाद 220 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 16 षटकार निघाले आणि त्याचा स्ट्राईक रेट 138.36 होता. उत्तर प्रदेशचा गोलंदाज शिवा सिंग (Shiva Singh) या षटकात गोलंदाजी करत होता.  शेवटच्या दोन षटकांमध्ये ऋतुराजने तब्बल 9 षटकार मारले. 49 व्या षटकात ऋतुराजने सात षटकार कुटले, ज्यापैकी एक नॉ बॉल होता.

ऋतुराजने या सामन्यात एका षटकात सात षटकार मारले, अगदी त्याच पद्धतीने भारताच्या माजी दिग्गजाने एका षटकार सात चौकार मारले होते. हा दिग्गज दुसरा-तिसरा कोणी नसून चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना (Suresh Raina) होता. रैना आयपीएल मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठ्या काळापर्यंत खेळला. आयपीएल 2014 मध्ये त्याने पंजाब किंग्जविरुद्धच्या एका सामन्यात एका षटकात 2 षटकार आणि 5 चौकार मारले होते. यातील एक षटकार त्याने नो बॉलवर मारला होता, अगदी ऋतुराजने नो बॉलवर षटकार मारला तसा. रैनाव्यतिरिक्त 2011 मध्ये वेस्ट इंडीजचा दिग्गज ख्रिस गेल (Chris Gayle) यानेही एका षटकात 7 चेंडू सीमारेषेपार मारले होते. (Like Rituraj Gaikwad ‘this’ Indian legend hit seven fours in one over, you will be surprised to hear the name)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गज म्हणतोय, ‘पृथ्वी शॉ टीम इंडियाचा कर्णधार होण्याचा दावेदार’
भारताच्या दिग्गजाचा मोफत सल्ला; म्हणाले, ‘भारताने वनडेत एकच संघ खेळवावा…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---