कोरोना व्हायरस, या जागतिक महामारीने सध्या भारत देशात हाहाकार माजवला आहे. प्रत्येक दिवसाला हजारोंच्या संख्येत कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. तेवढ्याच वेगाने कोरोना पिडीतांच्या मृत्यूचा दरही वाढत आहे. भारतातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतातील विमाने रद्द केली आहेत. लवकरच भारतीयांसाठी ऑस्ट्रेलियाच्या सीमाही बंद करण्यात येणार आहेत. यामुळे सध्या आयपीएल २०२१ साठी भारतात असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर संकट ओढावले आहे.
सीमा बंद झाल्याने आपण भारतातच अडकून राहू या भितीने आतापर्यंत ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे खेळाडू ऍडम झम्पा, केन रिचर्डसन आणि राजस्थान रॉयल्सचा अँड्र्यू टाय यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ९ न्यूजमधील वृत्तानुसार, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज स्टिव्ह स्मिथसह इतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाच्या सीमा बंद होण्याच्या कारणामुळे मायदेशी परतण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर, क्रिकेटपटूंव्यतिरिक्त प्रशिक्षक, समालोचक आणि इतर पदभार सांभाळत आयपीएल २०२१ चा भाग असलेले ३० ऑस्ट्रेलियन सदस्य भारत सोडण्यासाठी इच्छुक आहेत. असे झाल्यास, आयपीएल फ्रँचायझींना मोठ्या नुकसानाला सामोरे जाे लागऊ शकते.
येथे आम्ही सध्या आयपीएल २०२१ मध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आढावा घेतला आहे. तसेच त्यांनी माघार घेतल्यास फ्रँचायझीला किती रुपयांचे नुकसान झेलावे लागू शकते? याचीही माहिती देण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (एकूण १९.०५ कोटी)
डॅनियल ख्रिस्टियन- ४.८०कोटी
ग्लेन मॅक्सवेल- १४.२५ कोटी
डॅनियल सॅम्स- २० लाख
मुंबई इंडियन्स (एकूण ७ कोटी)
नाथन कूल्टर नाईल- ५ कोटी
ख्रिस लिन- २ कोटी
चेन्नई सुपर किंग्ज
जेसन बेहरनडॉर्फ- १ कोटी
दिल्ली कॅपिटल्स
स्टिव्ह स्मिथ- २.२० कोटी
सनरायजर्स हैदराबाद
डेविड वॉर्नर- १२.५० कोटी
कोलकाता नाईट रायडर्स (एकूण १५.९५ कोटी)
बेन कटिंग- ४५ लाख
पॅट कमिन्स- १५.५० कोटी
पंजाब किंग्ज (एकूण २६.२० कोटी)
मोझेस हेन्रिक्स- ४.२० कोटी
रिले मेरेडिथ- ८ कोटी
झाय रिचर्डसन- १४ कोटी
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात मिळाला नाही खरेदीदार, चेन्नईनेही दिला डच्चू; आता मुंबईसाठी बजावणार ‘ही’ भूमिका
DCला कोरोनाचा फटका; २.२० कोटींचा दिग्गज हंगाम अर्ध्यात सोडून मायदेशी परतण्याच्या तयारीत!