---Advertisement---

दिल्ली विरूद्ध मुंबईच्या सामन्यात मोडले जाऊ शकतात ‘हे’ मोठे रेकॉर्ड्स

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 6:36 PM
---Advertisement---

मागील वर्षीच्या आयपीएल मधील फायनलिस्ट असलेले दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमध्ये आज आमने-सामने येतील. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर संध्याकाळी ७.३० वाजेपासून हा सामना खेळवला जाईल. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंना अनेक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी मिळेल. कोणते विक्रम या सामन्यात केले जातील, याच आढावा आपण या लेखातून घेऊया.

१) अजिंक्य रहाणे – अजिंक्य रहाणेने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ३९४१ धावा केल्या आहेत. जर त्याला दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि जर त्याने ५९ धावा केल्या, तर आयपीएल मध्ये तो वैयक्तिक ४००० धावांचा टप्पा पार करेल. असे करणारा तो आयपीएल मधील ११वा खेळाडू ठरेल.

२) आर अश्विन – आर अश्विनने आत्तापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये २४९ विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध एक विकेट घेताच त्याच्या टी२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स पूर्ण होतील. हा कारनामा करणारा तो जगातील २३वा आणि भारताचा तिसरा गोलंदाज ठरेल.

३) इशान किशन – इशान किशनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ९३३ धावा केल्या आहेत. दिल्ली विरुद्ध आजच्या सामन्यात त्याने ६७ धावा केल्या तर आयपीएल मधील १००० धावांचा टप्पा तो गाठेल.

४) किरोन पोलार्ड – आजच्या सामन्यात एक चौकार मारताच किरोन पोलार्ड आयपीएल मध्ये चौक्रांचे द्विशतक पूर्ण करेल. असे करताच आयपीएल मध्ये २०० चौकार मारणारा तो ३७ वा ठरेल.

५) हार्दिक पंड्या – हार्दिक पंड्याने आत्तापर्यंत आयपीएल मध्ये ९३ षटकार मारले आहेत. आजच्या सामन्यात त्याने जर अजून ७ षटकार मारले तर तो षटकारांची शंभरी पूर्ण करेल. मुंबई इंडियन्सकडून १०० षटकार मारणारा तो केवळ चौथा खेळाडू ठरेल .

६) कृणाल पंड्या – कृणाल पंड्या आयपीएल कारकिर्दीत आजवर ४९ विकेट्स घेतल्या आहेत. दिल्ली विरुद्ध एक विकेट पटकावताच त्याच्या ५० विकेट्स पूर्ण होतील. मुंबईकडून आयपीएल मध्ये हा कारनामा करणारा तो सहावा गोलंदाज असेल.

७) पृथ्वी शॉ – पृथ्वी शॉने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ९३२ धावा केल्या आहेत. आजच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने ६८ धावा केल्या तर तो १००० धावांचा टप्पा गाठेल.

आता आजच्या सामन्यात कुठले खेळाडू हे रेकॉर्ड मोडणार आणि त्यासह आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या:

विराटचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न पडणार लांबणीवर? वाचा काय आहे प्रकरण

DC vs MI : नवख्या पंतसमोर अनुभवी रोहितचे आव्हान, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी हा घातक गोलंदाज झाला फिट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---