टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 35व्या सामन्यात बुधवारी (दि. 2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश संघ आमने-सामने होते. ऍडलेड मैदानावर झालेल्या या सामन्यात केएल राहुल हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. राहुलने आधी फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना भारताच्या चिंता वाढवणाऱ्या लिटन दास याला तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यान त्याने केलेल्या अफलातून क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारतीय संघ नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला उतरला. यावेळी फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 184 धावा चोपल्या होत्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज लिटन दास (Litton Das) याने तडाखेबंद अर्धशतक झळकावले. त्याने 21 चेंडूंचा सामना करताना 51 धावा चोपल्या. पुढे त्याने अशीच फटकेबाजी सुरू ठेवली होती. मात्र, त्याला धावबाद करत केएल राहुल (KL Rahul) याने पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
केएल राहुलचा शानदार थ्रो आणि लिटन दास तंबूत
भारताकडून 8वे षटक टाकण्यासाठी आर अश्विनला पाचारण केले होते. अश्विन षटकातील दुसरा चेंडू टाकत होता आणि यावेळी स्ट्राईकवर बांगलादेशचा नजमुल शांतो (Najmul Shanto) होता. हा चेंडू शांतोने डीप मिडविकेटच्या दिशेने मारला. हा चेंडू चपळ क्षेत्ररक्षण करत राहुलने पकडला आणि थेट यष्टीरक्षकाच्या एंडच्या दिशेने फेकला. यावेळी झाले असे की, लिटनला क्रीझपर्यंत वेळेत पोहोचता आले नाही आणि चेंडू थेट जाऊन स्टंपला लागला. त्यामुळे लिटन याला तंबूचा रस्ता धरावा लागला.
#wicket #Runout #KLRahul #inida #ICCT20WorldCup2022 #T20worldcup22 #T20WC2022 what a fealding 👍 pic.twitter.com/8Rh5AWPcdn
— Monazir khan (@monazir_khan) November 2, 2022
With Bat ✅
In Field with Crucial Runout ✅
Undoubtedly It's @klrahul 's Show 💥👑#INDvsBAN #KLRahul pic.twitter.com/HwgKqFBKR8— D I L E E P (@Dillu_Sayz) November 2, 2022
लिटन दास बाद झाला, तेव्हा तो 27 चेंडूत 60 धावांवर खेळत होता. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 7 चौकारही मारले. त्याच्या या खेळीमुळे बांगलादेश संघाला आव्हानाचा पाठलाग करण्यात मदत मिळाली.
Litton Das brings up his fifty off just 21 balls! 🤯#T20WorldCup | #INDvBAN | 📝: https://t.co/vDRjKeeGvf pic.twitter.com/sPM4wU5vch
— ICC (@ICC) November 2, 2022
पावसामुळे आव्हान झाले कमी
बांगलादेश संघ 7 षटकांनंतर एकही विकेट न गमावता 66 धावांवर खेळत होता. नेमका त्याचवेळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे हा सामना काही वेळ थांबवावा लागला होता. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना 16 षटकांचा करण्यात आला. तसेच, 185 धावांचे आव्हानही कमी होऊन 151 झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाने बदलला गेम! बांगलादेश पुढे 9 षटकात इतके आव्हान
टी20 विश्वचषकाचा सम्राट बनला ‘किंग कोहली’! लाजवाब खेळीत रचला नवा विश्वविक्रम