भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाची पळता भुई थोडी केली. भारताने हा सामना एक डाव आणि 132 धावांच्या अंतराने खिशात घातला. या मालिकेत भारताने 1-0ने आघाडीदेखील घेतली. एकीकडे भारताने विजय मिळवला, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. चला तर तो नकोसा विक्रम काय आहे, हे जाणून घेऊया…
पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 177 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने फलंदाजी करताना सर्व विकेट्स गमावत 400 धावा केल्या. यावेळी भारताच्या 223 धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा डाव अवघ्या 32.3 षटकात 91 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला हा सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकण्यात यश आले. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.
A splendid five-wicket haul in the second innings from @ashwinravi99 inspires #TeamIndia to a comprehensive victory in the first #INDvAUS Test 🙌🏻
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/wvecdm80k1
— BCCI (@BCCI) February 11, 2023
ऑस्ट्रेलियाचा नकोसा विक्रम
भारताविरुद्ध दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघ 91 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे आशियामध्ये खेळताना ऑस्ट्रेलियाच्या नावावर ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या नोंदवली गेली. ऑस्ट्रेलियाने आशियात सर्वात कमी धावसंख्या पाकिस्तानविरुद्ध 1956 मध्ये केली होती. कराची येथे खेळताना ऑस्ट्रेलियाचा डाव 80 धावांवर संपुष्टात आला होता. ही आतापर्यंतची ऑस्ट्रेलियाची आशियातील सर्वात कमी कसोटी धावसंख्या राहिली आहे.
ऑस्ट्रेलियाने आशियातील तिसरी सर्वात कमी कसोटी धावसंख्या ही 2004मध्ये वानखेडे येथे भारताविरुद्ध खेळताना केली होती. त्यावेळी त्यांनी सर्व विकेट्स गमावत फक्त 93 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने चौथी सर्वात कमी धावसंख्या ही 1959 दरम्यान कानपूर येथे भारताविरुद्धच केली होती. त्यावेळी त्यांनी 105 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या. (Lowest totals for Australia in Asia read here)
ऑस्ट्रेलियाची आशियातील सर्वात कमी कसोटी धावसंख्या
80 धावा- विरुद्ध- पाकिस्तान (कराची, 1956)
91 धावा- विरुद्ध- भारत (नागपूर, 2023)*
93 धावा- विरुद्ध- भारत (वानखेडे, 2004)
105 धावा- विरुद्ध- भारत (कानपूर, 1959)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनचे अनोखे विक्रमी ‘शतक’, यादीत ‘हा’ भारतीय दिग्गजच टॉपर
भारतीयांना सतावणाऱ्या मर्फीचा शमीने उठवला बाजार, गुडघ्यावर बसून भिरकावला गगनचुंबी षटकार; व्हिडिओ पाहाच