पुणे – यजमान लॉयला प्रशाला संघासह विद्या व्हओॅली आणि विद्याभवन प्रशाला संघांनी येथे सुरु असलेल्या लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. लॉयला प्रशालेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात १२ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने कल्याणी प्रशालेचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले. आदिराज सिंग आणि तनुष खुने यांनी गोल केले.
याच वयोगटात विद्याभवन प्रशाला संघाने विद्या व्हॅलीचा प्रतिकार ४-२ असा मोडून काढला. सामन्याच्या पहिल्या सात मिनिटात तीन गोल करून विद्याभवनने झकास सुरुवात केली होती. त्यानंतर विद्याव्हॅली संघाकडून रिआन खोगेकर आणि प्रत्युश वशिष्ठ यांनी गोल करून सामन्यात रंगत आणली. पण, विद्याभवनच्या जे. आदित्यने गोल करून संघाची आघाडी आधीत वाढवली होती.
विद्या व्हॅली संघाने या पुराभवाची परतफेड १६ वर्षांखालील गटात केली. सिद्धांत जाधव आणि आरुष कविश्वर यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी गोलच्या जोरावर विद्या व्हॅलीने विद्या भवनचा ५-३ असा पराभव केला. विद्या व्हॅलीसाठी अन्य एक गोल सिद्धार्थ संखोळकरने केला. विद्याभवनचे तीन गोल आदित्य धुमल, अंकित गवारे आणि अॅरन मेंडेस यांनी केली.
निकाल –
१६ वर्षांखालील – विद्या व्हओॅली ५ (सिद्धांत जाधव १३, २५वे मिनिट, सिद्धार्थ सांखोळकर ३८वे, आरुष काशिवार ४०, ५७वे मिनिट) वि.वि. विद्याभवन ३ (आदित्य धुमल ३०वे, अंकित गवारे ३६वे, अॅरन मेंडेस ४३वे मिनिट)
१२ वर्षांखालील – विद्याभवन ४ (अर्णव भोसले, २रे. ७वे मिनिट, जोनाथन साळवे ४थे, आदित्य १८वे मिनिट) वि.वि. विद्या व्हॅली २ (रिआन खोगेकर ९वे, प्रत्युष वशिष्ठ २२वे मिनिट)
लॉयला प्रशाला २ (आदिराज सिंग २०+३वे मिनिट, तनुष खुने ३५वे मिनिट) वि.वि. कल्याणी प्रशाला ० (Vidya Bhavan (White) and Vidya Valley (yellow) in action during their Under 16 match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार हजार कोटींचा मालक असणारा मेस्सी दिवसाकाठी कमावतो ‘एवढा’ पैसा, आकडा वाचून येईल आकडी
अर्जुन तेंडुलकरचा वेगवान चेंडू गोळीसारखा आला अन् फलंदाजाच्या दांड्या उडवून गेला