टीम इंडियाच्या माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटॉरपदी नियुक्ती झाली आहे. झहीर 2017 मध्ये भारतीय संघाचा गोलंदाजी सल्लाकार होता. याशिवाय तो मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्येही शामिल होता.
गेल्या काही महिन्यांपासून आयपीएलच्या इम्पॅक्ट प्लेअर नियमावरून मोठी चर्चा जारी आहे. आयपीएल 2024 दरम्यान अनेक आजी-माजी खेळाडूंनी या नियमावर आक्षेप घेतला होता. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं नुकसान होत असल्याचं अनेकांचं मत आहे. आता या नियमावर लखनऊचा नवनियुक्त मेंटॉर झहीर खाननं देखील प्रतिक्रिया दिली.
अनेक खेळाडूंच्या विपरित, झहीर खाननं इम्पॅक्ट प्लेअर नियमाचं समर्थन केलं आहे. झहीर म्हणाला, “मी पाहिलं की इम्पॅक्ट प्लेअर नियम चर्चेचा विषय बनला आहे. मात्र मी सर्वांसमोर सांगू इच्छितो की, मी याचं समर्थन करतो. या नियमामुळे अनेक अनकॅप्ड खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. यामुळे अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान मिळत नाही, मात्र जर तुम्ही बॅट किंवा बॉलनं उत्तम कामगिरी केली तर तुम्हाला खेळण्यापासून कोणी रोखू शकत नाही.”
आयपीएल 2024 दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या स्टार खेळाडूंनी या नियमाची आलोचना केली होती. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंसोबत अन्याय होत असल्याचं त्यांचं मत आहे. विराट कोहलीनं तर हे देखील म्हटलं होतं की, आयपीएल दिवसेंदिवस फलंदाजाना अनुकुल होत चाललं असून याचं कारण इम्पॅक्ट प्लेअर नियम आहे.
आयपीएल 2024 दरम्यान मोहम्मद सिराज, अक्षर पटेल यांसारख्या भारतीय खेळाडूंनी देखील इम्पॅक्ट प्लेअर नियमावर आक्षेप घेतला होता, ज्यानंतर आता पुढील हंगामात हा नियम असणार की नाही, याबाबत विचार करण्यात येणार असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे.
हेही वाचा –
आयपीएल 2025 मध्ये राहुल लखनऊकडूनच खेळणार? मालक संजीव गोयंका यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण
जय शाह यांचं एका महिन्याचं वेतन किती? बीसीसीआयमध्ये किती कमाई होत होती?
मोठी बातमी! इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती