---Advertisement---

LSGच्या गोलंदाजांची हरकत संपेना; दिग्वेशनंतर ‘या’ खेळाडूनं केलं लाजीरवाणं कृत्य, VIDEO

On: शुक्रवार, मे 23, 2025 10:18 AM
---Advertisement---

गुरुवारी 22 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात स्पिनर दिग्वेश राठीला संघात संधी मिळाली नाही. दिग्वेशला आधीच्या सामन्यात विकेट नंतर झालेल्या डिमेरिट पॉइंटमुळे एका सामन्यासाठी बंदी मिळाली होती. मात्र, त्याच्या अनुपस्थितीतही लखनऊच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. ज्यामध्ये आकाश सिंगने विशेष लक्ष वेधून घेतले, ज्याने जोस बटलरची विकेट घेतली आणि दिग्वेश राठीच्या खास शैलीत आनंद साजरा केला.

लखनऊने गुजरात टायटन्स समोर 236 धावांचे मोठे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने सुरुवातीला चांगली कामगिरी केली; त्यांनी 9.2 षटकांत 2 गडी गमावून 96 धावा केल्या. पण या टप्प्यावर आकाश सिंगने वेगवान गोलंदाजी करताना तिसरा चेंडू अचानक हळू फेकला, ज्यावर जोस बटलरने चेंडू हुकला व तो स्टंपवर आदळला. बटलरने 18 चेंडूत 33 धावा केल्या आणि महत्त्वाची विकेट गमावली. आकाशने दिग्वेश राठींच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये आनंद साजरा करत संघाच्या पॅव्हेलियनकडे इशारा केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या सामन्यात आकाशने 3.1 षटकांत 29 धावा देत 1 विकेट घेतली.

पाहा व्हिडिओ-

गुजरात टायटन्ससाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांनी आधीच प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले होते, पण टॉप-2 मध्ये स्थान राखण्यासाठी 25 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अंतिम लीग सामना जिंकणे गरजेचे आहे. गुजरातने आतापर्यंत 13 पैकी 9 सामने जिंकले असून त्यांचा हंगाम चांगला चालू आहे. या सामन्यामुळे पुढील टप्प्यांसाठी दोन्ही संघांची तयारी आणि मनोबल वाढणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---