इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १५वा सामना गुरुवारी (०७ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे होणार आहे. हा लखनऊ संघाचा चौथा सामना आहे. यापूर्वी त्यांनी खेळलेल्या ३ सामन्यातील २ सामन्यात विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे दिल्ली संघाने २ सामने खेळले असून, त्यातील एका सामन्यात विजय, तर दुसऱ्या सामन्यात पराभव मिळाला आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील. (LSG Won The Toss And Opted To Bowl First)
तत्पूर्वी, भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता उभय संघात नाणेफेक झाली. यावेळी लखनऊचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लखनऊ संघ एक बदलासह मैदानात उतरणार आहे. गोलंदाज कृष्णाप्पा गौतमला मनीष पांडेच्या जागी संधी मिळाली आहे.
दुसरीकडे दिल्ली (Delhi Capitals) संघात ३ बदल झाले आहेत. टीम सेफर्टच्या जागी संघात डेविड वॉर्नरची एन्ट्री झाली आहे. तसेच, एन्रीच नॉर्कियाने खलील अहमदची जागा घेतलीये. याव्यतिरिक्त तिसरा बदल म्हणजे, सर्फराज खानला मनदीप सिंगच्या जागी संघात घेतले आहे.
असे आहेत संघ-
लखनऊ सुपर जायंट्स- केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णाप्पा गौतम, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई आणि आवेश खान.
दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, सर्फराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रहमान आणि एन्रीच नॉर्किया.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईचा पराभव तर झालाच, पण रोहित शर्माच्या नावावर या नकोशा विक्रमाचीही नोंद, वाचा सविस्तर
MI vs KKR| नितीश राणा अन् जसप्रीत बुमराहला महागात पडली चूक; झाली मोठी कारवाई
IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल